१० गुंठे 'सिद्धीविनायक' शेवग्यास ४ थ्या महिन्यात फुलकळी, ३ शेंगा/७ ते ८ रुपयास विक्री
श्री. आनंदराव माळी, मु. पो. अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, मोबा. ८८०६६२५९३०
गेल्या २ वर्षापासून आम्ही शेवग्याची लागवड करीत आहोत. गेल्या ८ महिन्यापुर्वी 'सिद्धीविनायक' मोरिंगा या शेवग्याची माहिती मोरे यांच्याकडून मिळाली. त्यानंतर मोरिंगा शेवग्याच्या बियाची २ पाकिटे कोल्हापूर सेंटरवरून नेली. बियाण्याची जर्मिनेटर वापरल्याने उगवण चांगली झाली. रोपे साधारण १ महिन्यात तयार झाली. त्याची लागवड ९' x १०' अंतरवार १' x १' x १' चा खड्डा घेऊन त्यात कल्पतरू खत २०० ते २५० ग्रॅम मातीत मिसळून १० गुंठ्यामध्ये लागवड केली. पाण्याच्या पाळ्या ८ ते १० दिवसांनी देत होतो. ३० दिवसाच्या अंतराने सप्तामृताच्या २ फवारण्य केल्या. पहिल्या फवारणीने २ ते २।। फुट उंचीची झाडे झाल्यावर शेंडा कट केला आणि नंतर दुसरी फवारणी केली. त्यामुळे झाडांचा फुटवा वाढला. झाडांची उंची ४ ते ४।। फूट झाल्यावर फुलकळी लागली. फुळकळीची गळ होत असल्याने पुन्हा आपल्या कोल्हापूरच्या ऑंफिसमध्ये सल्ला घेण्यास गेलो. त्यांच्या मार्गदर्शनानुसार थ्राईवर ५०० मिली, कॉपशाईनर ५०० मिली, राईपनर २५० मिली, न्युट्राटोन २५० मिलीची फवारणी १०० लि. पाण्यातून केली. त्यामुळे फुलगळ जागेवर थांबली. शिवाय शेंगाही भरपूर लागल्या.
सातव्या महिन्यात शेंगा चालू झाल्या. दर आठ दिवसांनी शेंगाची तोडणी करीत आहे. ३ शेंगा ७ ते ८ रुपयेप्रमाणे विकल्या जात आहेत. आतापर्यंत ५ ते ६ हजार रुपये झाले असून शेंगाचे तोडे चालू आहेत.