१८ गुंठे मुरमाड जमिनीतील 'सिद्धीविनायक' शेवग्याने दिले पहिल्याच वर्षी ७५ ते ८० हजार, दुसर्या वर्षी १ लाख
श्री. बंडू भूपाल आवळे, मु.पो. आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. मोबा. ९५४५५४९२१९
पुर्वी आम्ही पारंपारिक पद्धतीने शेवग्याचे पीक घेतले होते. कृषी प्रदर्शनामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ( अॅग्रो) प्रा. लि. कंपनीविषयी माहिती मिळाली. नंतर या कंपनीचे कोल्हापूर प्रतिनिधी श्री. केदार मोरे यांच्या सल्ल्यानुसार माझ्या १८ गुंठे शेतामध्ये डॉ.बावसकर सरांचा 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लावला. सुरूवातीला ४ x ६ इंचाच्या पॉलिथीन पिशवीमध्ये रोपे तयार करून घेतली. रोपे ५० दिवसांची, सशक्त, मोठी झाल्यानंतर ती ८ x ८ फुटावर १ x १ x १ फुटाच्या खड्ड्यामध्ये लावण्यात आली. जमीन मध्यम प्रतीची आहे. नंतर रोपे ३ फुट उंचीची झाल्यानंतर त्याची शेंडा छाटणी केली. त्यामुळे जमिनीपासून प्रत्येक रोपास ४ -५ फांद्या फुटल्या.
जर्मिनेटरचे आळवणी दिले. कल्पतरू सेंद्रिय खत वेळोवेळी देऊन सप्तामृताच्या फवारण्या करत होतो. त्यामुळे बाग चांगलीच बहरली होती. झाडांची उंची १२ ते १५ फुटापर्यंत झाली होती. उत्पादनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर १८ गुंठ्यामधील शेवगा तोडणीस उरकत नसे. एका तोडणीच्यावेली २००० शेंगा असे आठवड्यातून ३ वेळा तोडे करावे लागत. ओळखीचे दलाल व कोल्हापूर मार्केटमध्ये या शेवग्याची चविष्ट आणि आकर्षक सुरेख शेंगा असल्याने आम्हाला दरही चांगला मिळत असे.
पहिल्या वर्षी ७५ ते ८० हजारचे उत्पादन मिळाले तर दुसर्या वर्षी १ लाखाच्यावरती उतपादन मिळाले असून अजून तोडे चालूच आहेत. आमचा शेवगा पाहून आसपासच्या बर्याच शेतकर्यांची शेवगा लावला आहे. आमच्या भागात जवळ -जवळ १५ ते २० एकर क्षेत्र शेवगा लागवडीखाली आले आहे. कमी पाणी, मध्यम मुरमाड प्रतीची जमीन व कमी खर्चात भरघोस उत्पादन मिळत असल्याने या भागातील बहुतेक शेतकरी लागवडीकडे वळू लागले आहेत.