३० ते ३५ 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या झाडांपासून २ महिन्यात २० हजार

श्री. प्रदीप अंबादास गोरे, मु. पो. पाटोदा, ता. आंबेजोगाई, जि. बीड, मोबा. ९९२३१०७३५१

माझ्याकडे ७.५ एकर शेती असून त्यामध्ये पारंपारिक ऊस, सोयाबीन, गहू अशी पिके घेत होतो. परंतु २ वर्षापूर्वी सहज पुणे मार्केटयार्डात माहिती घेण्यासाठी आलो असताना आपल्या ऑफिसमध्ये शेवगा व सप्तामृतची माहिती मिळाली. प्रयोग म्हणून टेरेसवर 'सिद्धीविनायक' शेवग्याची १५० रोपे आपल्या तंत्रज्ञानाने तयार करून शेतात लावली. आज रोजी शेवग्याच्या झाडाची उंची १० ते १२ फुट आहे. परंतु ह्या शेवग्याची उसामध्ये लागवड असल्यामुळे काही झाडे व्यवस्थित जोपासली गेली नाहीत, त्याची छाटणी करणे शक्य झाले नाही, त्यामुळे त्यातील फक्त ३० ते ३५ झाडांपासून व्यवस्थित उत्पादन घेता आले. या झाडांना २५० ते ३०० शेंगा लागल्या होत्या. आम्ही या शेंगा लातूर, आंबेजोगाई बाजारात तसेच गावातील आठवड्या बाजारात विकत होते. आम्हाला येथे १५ ते २५ रू किलो भाव मिळाला. या शेवग्यास कोणत्याही प्रकारचा इतर खर्च केला नाही. शेंगा एवढ्या उत्कृष्ट आहेत की, लोक शेंगा खरेदी करण्यासाठी मालाची वाट पाहतात. या ३० ते ३५ झाडांपासून २ महिन्याच्या बहारामध्ये २० हजार रुपये उत्पन्न मिळाले. या अनुभवातून 'सिद्धीविनायक' शेवग्याची नवीन ३५० रोपे आणि पपईची २० रोपे घेऊन जात आहे. त्यांची स्वतंत्र लागवड करून आपल्या तंत्रज्ञानाने अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न राहील. सोयाबीन १ एकराला कल्पतरू सेंद्रिय खत वापरून सप्तामृताची फवारणी करत आहे. त्यासाठी सप्तामृत प्रत्येकी २ लिटर घेऊन जात आहे.

New Articles
more...