अत्यंत कमी पाण्यावर केशर आंब्यातील 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी
डॉ. प्रकाशचंद्र भवरीलाल घलानी, मु. पो. बेंबळी, ता. जि. उस्मानाबाद. मोबा. ९३२३०००५९६
आम्ही ५ वर्षापुर्वी १५' x १५' वर केशर आंब्याची ७०० झाडे लावलेली आहेत. त्यामध्ये 'सिद्धीविनायक' शेवगा १- १ झाड लावले आहे. सप्टेंबर २०११ मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची ५० पाकिटे बियाणे कृषी जीवन अॅग्रो, वैराग, ता. बार्शी (सोलापूर) यांच्याकडून आणून शेवगा पुस्तकात दिल्याप्रमाणे जर्मिनेटरमुळे ४८०० रोपे तयार झाली. म्हणजे १६% उगवण झाली. रोपे झाडाखाली ठेवली, काही रोपे उन्हात राहिली. रोपे लहान असताना पाने कुरतडणारी अळी आली व दोन दिवसामध्येच जवळपास ५०० ते ६०० रोपे अळीने कुरतडून टाकली. त्यामुळे तेवढी रोपे वय गेली. बाकीच्या रोपांच्या लागवडीच्यावेळी जर्मिनेटरच्या द्रावणात रोपे बुडवून लागवड केल्याने सर्व रोपे लवकर वाढायला लागली. नंतर जर्मिनेटर, थ्राईवर, प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी केली. तसेच हिंदुस्तान कृषी सेवा केंद्र, उस्मानाबाद येथून कल्पतरू खत आणून १५ बॅगा आंबा आणि शेवगा या दोन्ही पिकांना दिले. त्याचबरोबर गांडुळखतही वापरले. शेवग्याच्या झाडाची कमी अधिक प्रमाणात वाढ झाली होती. कारण ड्रीपचे पाणी काही झाडांना कमी अधिक मिळत होते. परंतु तरीही श्री. गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे शेवग्यास लागवडीपासून ३।। - ४ महिन्यात भरपूर फुलकळी निघाली. फुलकळी निघण्यअगोदर प्रत्येक झाडांचे शेंडे छाटावे लागतात. परंतु आमच्या गावासह जवळपासच्या १० ते १२ गावात यंदा फक्त १६ मिमी पाऊस झाला. एवढ्या कमी पाऊसाची नोंद यापूर्वी कधी झाली नाही. त्यामुळे आमचे तीन बोअर मधील एक बोअर उन्हाळ्याची चाहूल लागताच बंद पडले. तर दुसरे बोअर २ महिन्यापुर्वी (मार्च अखेरीस) बंद पडले. एका बोअरला थोडे पाणी आहे ते दिवसातून १।। तास चालते. तेवढ्यावर घागरीने पाणी वाहून या आंब्याला आणि शेवग्याला देतो. शेवग्याला फक्त २ वेळा ते पण थोडे थोडेच पाणी दिले. तरीदेखील झाडे हिरवीगार आहेत. मात्र पणी कमी असल्याने फुलगळ झाली. तर पण अत्यंत कमी पाण्यात दुष्काळी परिस्थितीत थोड्याफार शेंगा लागल्या आहेत. आंब्याला मोहोर लागला होता, मात्र तोड दुष्काळी परिस्थितीने गळाला. म्हणून चालू वर्षी १ कोटी लि. क्षमतेचे शेततळे करणार आहे.
'सिद्धीविनायक' ब्रँडींग ते मार्केटिंग करणार
वरील शेती मी पुर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करीत आहे. सेंद्रिय केशर आंबा याच्याकरिता रजिस्ट्रेशन करून गेल्यावर्षी स्वत: आंबे घरी पॅक करून इंटरनेटवरून मार्केटिंग करून मागणीप्रमाणे पैसे घेऊन आंबे पार्सलने पाठविले आहेत. ह्याप्रकारे 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याचेदेखील मार्केटिंग करणार आहे. तसेच शेततळयाचे काम झाल्यानंतर पुढील जून - जुलैमध्ये पाऊस झाल्यावर नवीन ७ ते ८ हजार केशर आंब्याची लागवड करणार आहे.