सिद्धी-विनायक मोरिंगा शेवग्याचे भरघोस व दर्जेदार उत्पादन
मोरिंगा शेवग्यापासून ११ महिन्यात ७५ हजार नफा
ज्ञानोबा कृष्णाजी वरपे, मु.पो. मरकळ, ता.खेड, जि.पुणे फोन:(९५२१३५) २४६११६
मोरिंगा शेवग्याची दीड एकर क्षेत्रात जुलै २००१ मध्ये लागवड केली. बियापासून शेंगा काढणीपर्यंत
सरांचा सल्ला घेत होतो. जमीन काळी आहे. पाणी विहीरीचे ८ - १० दिवसाच्या अंतराने पाटाने
देतो. शेवग्याला १ महिन्याच्या अंतराने पंचामृताच्या ४ फवारण्या केल्या व कल्पतरू वेळा दिले. पहिली
फवारणी केल्यानंतर झाडांची २' - ३' वाढ झाल्यावर शेंडा मारला व नंतर कल्पतरू खताचा १ डोस दिला
आणि लगेच फवारणी केली. त्यामुळे झाडांची वाढ ४ - ५ फुट झाली. फुलकली ६ व्या महिन्यात (जानेवारी २००२ ) लागली,
त्यावेळी तिसरी फवारणी घेतली. त्यामुळे फुले टिकून (गळ झाली नाही) राहिली व शेंगा लागण्यास
सुरुवात झाली.शेंगा लागल्यावर चौथी फवारणी घेतली. शेंगा भरपूर लागल्या. तोडा १ मार्च
२००२ ला केला. सुरुवातीला आठ दिवसांच्या अंतराने तोडा करीत होतो. २५ ते ५० किलो शेंगा
निघायच्या नंतर माल वाढल्यामुळे दररोज तोडा करण्यास सुरुवात केली. ५० - ६० झाडांचा
माल दररोज तोडत होतो. १५० ते १७० किलो शेंगा निघायच्या. त्यामुळे १० दिवसांनी पुन्हा
त्याच झाडांच्या शेंगांची तोडणी करण्यासाठी फेरा येत होता. मालाची विक्री संत ज्ञानेश्वर
भाजी मार्केट भोसरी येथे दलाल शेख यांच्या तर्फे केली. पहिल्या महिन्यात ८ ते १० रू.
किलो भाव मिळाला. व दुसऱ्या महिन्यात १० ते १२ रू. किलो भाव मिळाला. याप्रमाणे सरासरी
दररोज खर्च जाऊन १२०० ते १४०० रू. शिल्लक राहत होते. भोसरी मार्केट दररोज चालू असते.
त्यामुळे तोडा एक दिवससुद्धा चुकत नव्हता. शेंगा तोडायला घरचीच माणसे असल्याने मजुरांचा
खर्च वाढला नाही. शेंगाची तोडणी १ एप्रिल पासून ते ३१ मे पर्यंत दररोज चालू होती. माल
चालू झाल्यावर रोग कीड आलीच नाही. त्यामुळे फवारणीची पुन्हा आवश्यकता भासली नाही. कल्पतरू
शिवाय दुसरे कुठलेच खत वापरले नाही. त्यामुळे कीड आली नाही. या प्लॉटचे खर्च जाऊन ७५,०००
रू. झाले. नंतर १ एकर प्लॉट ची १ महिन्यापूर्वी शेंगा कमी झाल्यावर छाटणी केली व आर्धा
एकराचा प्लॉट खाली ठेवला. त्याच्या शेंगा चालू आहेत. आठ दिवसाला तोडा करतो, तर ४० किलो
माल निघत आहे. बाजार भाव १८ ते २० रू. किलोला मिळत आहे. कारण आमचे भागात पाऊस नसल्याने
फुलगळ बऱ्याच प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शेंगा मार्केटमध्ये फार कमी प्रमाणात येते
आहेत.
१ एकर छाटणी केलेल्या प्लॉटमध्ये शेपू व कोथिंबीरीचे आंतरपीक घेतले आहे. शेपूवर उद्या
पंचामृताची फवारणी करणार आहे. शेपूची वाढ खुंटली आहे. तसेच या प्लॉटची छाटणी केल्यानंतर
नवीन फुटीला हिरवी आळी असल्याने फुट वाढत नाही. या दोन्ही कारणासाठी पंचामृत औषघे घेण्यासाठी
आज आलो आहे. शेपू व कोथिंबीर १५ दिवसात चालू होईल. धना ६ किलो टाकला आहे. त्याला जर्मिनेटर
वापरले होते. उगवण १२ दिवसांनी पूर्ण झाली व शेपू आठ दिवसात उगवून आली. आपल्या तंत्रज्ञानाने
मागील अनुभवानुसार १ किलो धन्यापासून २०० गड्डी निघते. आता भाव चांगले आहेत. कोथिंबीर
लवकर निघण्यासाठी पंचामृताची फवारणी घेणार आहे. फवारणी केल्यावर कोथिंबीरीची वाढ
झपाट्याने होऊन पानांना चमक येते व बाजारात नेल्यावर माल सुकत नसल्याने भाव इतरांपेक्षा
जास्त मिळतो. हा आमचा अनुभव आहे.