दोन-तीन महिन्यात 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून ६० हजार, शिवाय कैरीचे मार्केटिंग!

श्री.मारुती सीताराम बट्टेवाड(१२ वी पास), मु.कोल्हा, पो.मेंडका , ता.मुदखेड, जि.नांदेड. मो. ९८२३१३४०५०

जून २००७ मध्ये दीड एकरमध्ये शेवग्याची लागवड ८'x ८' वर केली आहे. त्याला ७ महिन्यात माल चालू झाला. तोड्याला १० ते १५ पोती आठवड्यातून २ वेळा निघत असे. पोते २० किलोचे भरते. नांदेड बाजारपेठेत १२ ते १५ रू. किलो भाव मिळतो. डिसेंबरअखेर माल सुरू झाला तो अजून चालू आहे. बारीक-बारीक शेंगा, फुले लागतच आहेत. जमीन मध्यम काळी, दांडाने पाणी १५ दिवसाला देतो. पाणी थोडे कमी आहे. ५-६ मुले १ तासात २५० ते ३०० किलो शेंगा तोडतात. त्यानंतर पोती भिजवून शेंगावर पाणी मारून पोत्यामध्ये भरतो. त्याला १ तास लागतो. कोल्हा ते नांदेड ३५ किमी अंतरासाठी संपूर्ण माल वाहतूकीस २०० रू. भाडे घेतात. तरोडा येथे आठवडा बाजारात (बुधवारी) शेवगा पाठवितो, शुक्रवारी शिवाजीनगर (नांदेड) येथे माल देतो. रविवारी इतवारा (नांदेड) येथे किरकोळ विक्री करतो. सर्वसाधारण आठवड्यातून २ वेळच्या मालाचे ३ -४ हजार रू. पट्टी लागत आसे. २-३ महिन्यात या शेवग्यापासून ६० हजार रू. मिळाले.

या आनुभववरून आज 'सिद्धीविनायक' शेवगा बी घेण्यासाठी आलो आहे. सरांची पुस्तके वाचली होती. आज प्रत्यक्ष भेट झाली. अजून ३ एकर शेवगा लावायचा आहे.

मी डाव्या पायाने ६०% अपंग असल्याने स्वतः कष्ट करू शकत नाही. आई-वडील कष्ट करतात, तसेच मजुरांकडून काम करून घेतात. मी मार्केटींग करतो.

मी आमच्या भागातील आंबा (कैरीची) होलसेल झाडावर खरेदी करतो. एक झाड ४-५ हजार रू. ला घेतो. त्यापासून १५-२० पोती (१०-१२ क्विंटल) माल निघतो. तो इंदोरला (म.प्र.) १२०० ते १५०० रू. क्विंटल दराने जातो. वाहतूक खर्च क्विंटलला २०० रू. येतो. इंदोरला खुली विक्री होऊन रोख पैसे मिळतात.

New Articles
more...