डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी छत्तीसगडमधील शेतकर्यांचा जीवनमानात वाढ
श्री.विनायक मानापुरे, (B.Sc.Agri.) (वरिष्ठ उद्यान विकास अधिकारी) शासकीय उद्यान
रोपणी, अहेरी, जि.दुर्ग (छतीसगड ) मो.०९२२९१६०१०४
'सिद्धीविनायक' शेवगा (मुंगना) चे बियाणे मी गेली ५ वर्षापासून पुण्याहून घेऊन जात
आहे.त्याची रोपे शासकीय रोपवाटीकेत तयार करून दुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांना शासकीय
दराने देतो. आतापर्यंत ७० शेतकर्यांनी रोपे नेली आहेत.हे शेतकरी शेताच्या बांधाने
२५ ते ५० झाडे लावतात.
'सिद्धीविनायक' शेवगा अधिक प्रिय !
यामध्ये श्री. तापस चंदखुरी (दुर्ग) यांनी शेतामध्ये ४०० झाडे लावलेली आहेत. प्रत्येक झाडापासून एका बहाराला २० ते २५ किलो शेंग निघते. शेंग काढणीस तयार झाल्यावर ८-१० दिवस काढण्यास उशीर जरी झाला, तरी शेंग निबर (कडक) होत नाही. त्यामुळे छत्तीसगडचे शेतकरी कोईमतूर १,२ पेक्षा या शेवग्याची जास्त प्रमाणात मागणी करतात. तसेच इतर जातींच्या तुलनेत उत्पादन, शेंगेची गुणावता अधिक (बी लहान, मऊ, मगज अधिक, चवदार, लांबी मध्यम शेंग हिरवीगार आकर्षक) असल्याने शेतकरी आवर्जून 'सिद्धीविनायक' जातीच्याच शेवग्याच्या रोपांची मागणी करतात. आमच्या भागात शेवग्यास मंदीत १० रू. ते तेजीत ४० रू./ किलो भाव मिळतो.
आम्ही नर्सरीमध्ये लिंबू, पपई, सिताफळ, आवळा, पेरू, जंगली लागवाडीसाठी - निलगिरी, कपोक, खमार, करंज, बांबू तसेच फुलांची रोपे तयार करण्यासाठी जर्मिनेटरची बीजप्रक्रिया नेहमी करतो. त्याने ९० ते ९५% बियांची उगवण होते.
निलगिरी, लिंबू तसेच फुलझाडे यांच्या बियांची उगवण अतिशय कमी होते. साधारण ५०-६०% च उगवण होते. तसेच रोपे वाढीस जड काळ लागतो. तेच जर्मिनेटर वापरल्याने २५० ग्रॅम निलगिरीच्या बियापाहून ५०,००० हून अधिक तयार रोपे मिळाली. ६० किलो लिंबाचे बी आणले होते. त्याची २ ।। लाख रोपे तयार झाली मात्र सध्या लिंबाची रोपे ढगाळ वातावणामुळे जळून जात आहेत. मागे असाच प्रॉब्लेम आला होता तेव्हा 'स्प्तामृत' वापरले, तर रोपे टवटवीत झाली होती म्हणून सध्याच्या या समस्येवर मात करण्यासाठी सरांचा सल्ला व स्प्तामृत घेण्यासाठी आलो आहे. आज (२१/११/०८) स्प्तामृत प्रत्येकी ५०० मिली तसेच 'सिद्धीविनायक' शेवग्याची ५ पाकिटे बी घेऊन जात आहे. दोन शेतकर्यांची ४०० रोपांची ऑर्डर आहे, त्यासाठी तसेच किरकोळ रोपांच्या विक्रीसाठी हे बी घेतले आहे (यावेळी सरांनी श्री. मानापुरे यांना 'कृषी विज्ञान' चे अंक व शेवगा, डाळींब, केळीची पुस्तके भेट दिली.)
आमच्या नर्सरीतच १५० झाडे शेवग्याची लावली आहेत. त्यातील १०० झाडे 'सिद्धीविनायक' शेवग्याची तर बाकीची इतर जातींची प्रात्यक्षिक तुलना करण्यासाठी म्हणून लावली आहेत. या प्लॉटच्या शेजारीच मधुमक्षिका पालन प्रकल्प आहे. या शेवग्याच्या झाडांवर मधमाशा जास्त आकर्षित होऊन मधाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे प्रकर्षाने आढळले आहे.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटला ४ वर्षापूर्वी फुलोद्यान विभाग आंतरराज्यीय भ्रमण योजनेद्वारे दुर्ग भागातील शेतकर्यांनी भेट दिली होती. सरांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी शेतीत सुधारणा केल्याने सध्या त्यांची परिस्थिती सुधारली आहे. त्यावरून आता वरील योजनेमार्फत 'किसान प्रदर्शन' पाहण्यासाठी (१७ डिसेंबर २००८) रोजी पुण्याला आल्यानंतर पुन्हा आपल्या मार्ग दर्शनासाठी इन्स्टिट्यूटला शेतकर्यांसह भेट देण्यास इच्छुक आहोत.