कमी पाण्यावर, दुष्काळी भागात शेवग्याची यशस्वी लागवड
आदिवासी भागात यशस्वी लागवड मोरिंगा शेवग्याची
श्री. लक्ष्मण गोरख चौधरी मु.पो. मोड, ता.तळोदा, जि.नंदूरबार फोन:(०२५६७) २३६४८०
१९९९ मध्ये शेवग्याची कार्यशाळा या कार्यक्रमाला पुण्यामध्ये मी आलो होतो. तेव्हा 'कृषी
विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरली, त्यामधील माहितीनुसार शेवग्याची लागवड दीड
एकरमध्ये ८' x ७' अंतरावर डिसेंबर २००० मध्ये केली. सुरुवातीला बियाला जर्मिनेटर जळगावमधून
नेले होते. जर्मिनेटरमुळे बियांची १०० % उगवण झाली. रोपे महिन्यातच लागवडीस आली. लागावादिनंतर
१ महिन्याच्या अंतराने पंचामृत फवारणी घेत होतो. २ ।। फुट उंचीची झाडे असताना शेंडा
मारला (पहिली छाटणी केली). त्यामुळे बाजूच्या फांद्याची वाढ होऊ लागली. नंतर ५ फुट
असताना एकदा शेंडा मारला. शेवग्याला तिसर्या महिन्यातच फुलकळी लागली. पोसला ५व्या
महिन्यात मार्केटमध्ये शेंगा नेऊ लागलो. शेंगाची तोडणी दररोज करीत होतो. एकूण १७ ओळी
होत्या. त्यापैकी दररोज २ - ३ ओळींचा माल तोडत असे. एका ओळीत ७५ झाडे आहेत. १५० किलो
शेंगा दररोज मार्केटला पाठवत होतो. तर यापैकी तळोदा, शहादा, आणि नंदुरबार या तिन्ही
ठिकाणी थोडा - थोडा माल पाठवत होतो. त्यामुळे बाजारात मालाची विक्री झटपट होत असे.
मे २००१ ला चालू झालेला माल मे २००२ पर्यंत चालूच होता. सुरुवातीच्या मालाला १५ - -१६
रू. किलो भाव मिळत होता. मादीच्या काळात ७ - ८ रू. किलो भाव मिळत होता. या एका वर्षात
या शेवग्यापासून १ लाख २० हजार रू. झालेत. शेवग्याला पंचामृताच्या तीनच फवारण्य केल्या.
दुसरी कशाचीच फवारणी केली नाही.
नंतर मे २००२ मध्ये झाडांची खालून दीड फुटावर पूर्ण छाटणी केली. चातानिनंतर पहिल्या
बहाराप्रमाणेच फवारणी घेतली. पाने गुंडाळणारी आळी पावसाळ्यात येते त्यासाठी प्रोटेक्टंट
पावडरीचे पंपाला १ बरणीचे झाकण घेतले की पूर्ण कंट्रोल होते. शेणखत दिले होते. दिवळीनंतर
शेंगा पुन्हा चालू झाल्या. दुसर्यावर्षी झाडांना कसलेच पाणी देऊ शकलो नाही. पावसाच्या
एका पाण्यावरच हा बहार चालू झाला होता. तर या बहारापासून खर्च न करता ५० हजार रू. झाले.
त्यातील तोडताना चुकून राहीलेल्या, निबर मोठ्या शेंगा तशाच झाडावर ठेवल्या. त्या शेंगापासून
बी काढून त्यापासून तेल काढत आहे. ३५ किलो बियापासून ५ किलो तेल निघते. त्या तेलाचा
उपयोग नाजूक यंत्रामध्ये वंगण म्हणून होत असल्याने त्याला २८०० रू. किलो भाव मिळत आहे.
तसेच तेल काढल्यानंतर शिल्लक राहणारी पेंडी ही असिडीटीची बाधा असणार्या लोकांना छोट्या
पाऊचमधून सॅम्पल दिले तर त्याचा चांगला रिझल्ट आला. त्यामुळे पेंडीला मागणी वाढली आहे.
एक किलो पेंड ही १ हजार रू. भावाने विकली जात आहे.
मी कार्यशाळेला आलो तेव्हा मला लिहीता वाचता येत नसल्याने माझ्या सोबत एक लेखनिक आणला
होता. त्यामुळे कार्यशाळेत झालेले वेगवेगळ्या मार्गदर्शनाच्या नोटस (टिपण) तयार केल्या
व माहिती घरी गेल्यानंतर त्याच्याकडून वाचून घेतली. तसेच इतर वेळी अडचण आली की, मी
त्याला (लेखनिकाला) बोलावून घेतो व त्याच्याकडून सविस्तर समजावून घेऊन त्या आधारे काम
करतो. तर याचा फायदा म्हणजे पाणी नसताना दरवर्षी ५० हजार रू. मिळतात.