बीडच्या दुष्काळी भागातील गावोगावच्या अनेक शेतकऱ्यांन सरांच्या शेवगा पुस्तकाने दिली 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीची प्रेरणा

श्री.सुभाष पांडुरंग धस (M.A. हिंदी, इंग्लिश), बालाघाट, शिक्षक कॉलनी, कॅनॉंलरोड, बीड. मो. ९४२१५५५८००.

आम्ही बीड जिल्ह्यामध्ये १०० गावात १०० शेतकरी मंडळे स्थापन केली आहेत. ३० शेतकर्‍यांचे एक मंडळ असून मंडळाचे अध्यक्ष हे पदवीधर व उच्च पदवीधर आहेत. यातील ५० गावात नाबार्डबरोबर आमचे काम चालते आमच्या या मंडळातील शेतकर्‍यांकडील एकूण २५ हजार एकर क्षेत्र हे ८ माही बागायत आहे. तर यातीलच ३-४ हजार एकर क्षेत्र हे बारमाही बागायत आहे. दर महिन्याला या मंडळांमध्ये आमच्या मुख्य विषयावर अध्यक्षांमार्फत सभा होते. यातून अनेक आधुनिक विषय हाताळले जातात आणि नवनवीन तंत्रज्ञानचे प्रयोग केले जातात.

नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवीत असतानाच गेल्यावर्षी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे "लावा शेतात सिद्धीविनायक शेवगा मोरिंगा, तुमच्या भोवती पैसा घालेल पिंगा..." हे पुस्तक मिळाले. त्यातील शेतकर्‍यांचे अनुभव आचून आम्ही प्रभावित झालो. 'सिद्धीविनायक' शेवगाच आजच्या बदलत्या परिस्थितीत खात्रीशीर उत्पादन व बाजारभाव मिळवून देणारे पीक असल्याची खात्री पटली. कमी पाण्यावर, वरकस जमिनीत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून खात्रीशील उत्पादन मिळवून देणार्‍या या आरोग्यवर्धक शेवग्याची लागवड करण्याचे ठरविले. प्रथम डिसेंबर २००९ मध्ये १० पाकिटे बी घेऊन गेलो होतो. त्यातील ५०० झाडे ३-४ गावात मिळून लावली आहेत. तो सध्या फुलकळी अवस्थेत आहे. याच काळात अधिक शेवगा लागवडीचा संकल्प असताना कोणताही नवीन प्रकल्प राबविण्यासाठी अगोदर नियोजन करावे लागते. महिन्याच्या सभेत ते विषय मांडून जागृती करावी लागते आणि याच काळात उन्हाळा आल्याने रोपे जगतील कि नाही, व्यवस्थित नियोजन होईल कि नाही याविषयी धोका पत्करणे परवडणारे नव्हते. कारण १०० गावात प्रत्येक मंडळात ३० शेतकरी असा हा सरांचा प्रयोग आम्हाला यशस्वी करायचाच होता. यामध्ये आमचे ३-४ महिने निघून गेले.

आता जून महिन्यात चालू हंगामात १०० एकर सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा लागवड करायचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्याकरिता प्रथम सरांचा सल्ला घेण्यासाठी आज आलो आहे.

यामध्ये सरांनी सांगितले, 'सिद्धीविनायक ' शेवग्याची शेंग दीड फुटाची गरयुक्त, मासाळू व चवदार असल्याने खात्रीशीर बाजारभाव मिळतो. याचे लागवडीपासून ७ व्या महिन्यात उत्पादन चालू होत असून वर्षातून २ बहार मिळतात. या पिकास रोग-किडीचा प्रदिर्भाव कमी असतो. त्यामुळे आम्ही याला 'काल्पवृक्ष' संबोधन आहे. तेव्हा याची लागवड मोठ्या क्षेत्रावर करण्यास काहीच हरकत नाही. मात्र हे करत असताना काही बाबी कटाक्षाने पाळाव्यात, त्या म्हणजे शेवग्याची लागवड करत असताना त्याची छाटणी ही उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब असते. त्यामुळे अधिक क्षेत्रावर लागवड करण्यासाठी त्या-त्या शेतकर्‍याकडे शेवग्याची ८-८ दिवसाला शेंडा खुडण्यासाठी माणसांची उपलब्धता असावी. त्यानुसार क्षेत्र ठरवावे. सरासरी प्रत्येक शेतकर्‍याने १ ते २ एकर एवढेच क्षेत्र लागवड करणे ठीक आहे. त्याहून अधिक पहिल्या वर्षी लावू नये. त्याचबरोबर शेवग्याचे जेव्हा भाव वाढलेले असतात त्या काळात अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी किंवा भारनियमनाच्या समस्येमुळे शेतकर्‍यांकडून शेवग्याला प्रमाणापेक्षा जास्त पाणी (ठिबक अथवा पाटाने) हिवाळ्यात, पावसाळ्यात व जमेल तेव्हा दिले जाते आणि इथे गणित चुकून शेंडावाढ जोमाने होऊन फुलकळी लागत नाही. काळी जमीन असेल तर लागलेली फुलकळी गळते किंवा शाखीय वाढ जोरात होऊन छाटणी निट करता येत नाही. तेव्हा या काळात (फुलकली अवस्थेत) ५ दिवसाड १६ लि. पाणी द्यावे. झाडाचा आकार, मालाचा प्रकार, शेंगांची संख्या यानुसार पाण्याचे प्रमाण ठरवावे.

साधारणपणे मार्च महिन्यात शेवग्याचे भाव वाढतात,एप्रिलमध्ये थोडे उतरतात, नंतर जून ते ऑगस्ट एवढे भाव वाढतात की, ते ४० ते ४५ काही भागात ६० ते ८० रू. किलोहून १२० रू. किलोपर्यंत होतात. सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात भाव कमी होतात. ते पुन्हा ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये वाढतात, असे सर्वसाधारण शेवग्याचे मार्केट राहते.

आमच्या बीड भागात ५० रू. किलो भाव मार्चमध्ये होता. तर सरासरी १५ ते २० रू. किलो भाव असतो.

सरांनी सांगितले "१०० एकर क्षेत्रावर शेवगा लागवड केल्यावर सर्वांचे उत्पादन एकाच वेळी येणार नाही असे पहावे. त्याचबरोबर माल देशभरात किमत १०० ठिकाणी पाठवावा, म्हणजे बाजारभावाची माहिती होते आणि त्यानुसार अवलंब करता येतो."

"आम्हाला नगरपालिका शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेला शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणार आहे." - धर.

यावेळी सरांना भेटलेल्या गुलबर्गाच्या शेतकर्‍याचा अनुभव सरांनी सांगितला, "त्या ठिकाणी शेवग्याचे १ पेरे (तुकडा बोटा एवढा साधारण २ ।।"ने ३") ५ रू. ला जाते. कर्नाटक किंवा दक्षिण भारतात शेवागाशिवाय सांबार होत नाही. म्हणून शेंगा मांसल साताच्या आंगठ्याच्या जाडीच्या असताना काढव्यात. या शेवग्याची निर्यात आखाती राष्ट्रात, कॅनडा, युरोप या देशात होऊ शकते. UNCTAD, UNIDO (Vienna), W.H.O., W.B., IMI, RBF, NABARD, देशाचे आयुर्वेदिक खाते, अपेडा, आयुर्वेदीक वैध, ग्रामीण व शहरी आरोग्य व काळजी हे कोर्सेंस केलेले डॉक्टर्स यांनी शेवग्यावर केलेले विविध प्रयोग. यावरील आपले अनुभव (निष्कर्ष) पाठवावेत. तसेच शेवग्याच्या विविध भागापासून आरोग्यवर्धक अशा विविध विषयांवर डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीने कार्यशाळा भरविण्याचे योजिले आहे. तरी संबंधीतांनी त्याचा लाभ घ्यावा. ठिकाण व वेळ हि पुढील अंकात कळविली जाईल.

"शेवग्याचा कांदा, कापूस, उस होऊ नये याकरिता ५० ते १०० वर्षाचे नियोजन करायचे आहे, म्हणून हा प्रपंच!" - सर.

'सिद्धीविनायक' शेवग्याच्या लागवडीचे पायलट प्रोजेक्ट (पथदर्शक प्रकल्प) बीड जिल्ह्यात यशस्वी !

गेल्यावर्षी बीड जिल्ह्यातील आमच्या ग्रुपमधील शेतकऱ्यांनी जवळपास ६० - ७० एकर क्षेत्रावर 'सिद्धीविनायक' शेवगा लावला आहे. अर्ध्या एकरपासून ३ -४ एकरपर्यंत असे प्लॉट आहेत. यावेळी आम्ही पीकेएम-१ या वाणाचाही वापर केला होता. दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास करून चालू वर्षी (जून २०११) योग्य त्या वाणाचा शेवगा लागवडीचा संकल्प होता.

'सिद्धीविनायक' शेवगा सरसच !

यामध्ये आमच्या असे निदर्शनास आले की, पीकेएम-१ ह्या वाणाच्या शेंगांचे उत्पादन सुरू होण्यास ८ ते ९ महिन्याचा कालावधी लागला. लांबी दीड- दोन फुटाची आहे. गर चांगला आहे, मात्र शेंगांचा वरून कलर काळपट असल्याने मार्केटमध्ये भाव 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या तुलनेत कमी मिळतोय. 'सिद्धीविनायक' शेवग्याचे उत्पादन ६ व्या महिन्यात सुरू होऊन शेंगा लांबीला सारख्या असून दोन्ही वाणांचा गर चांगला आहे. मात्र 'सिद्धीविनायक' शेवग्याचे खास वैशिष्ट्ये असे की, मार्केटचा दृष्टीने या शेंगेला वरून हिरवट पोपटी, उठावदार कलर असल्याने मालाची जादा भावाने लवकर विक्री होते.

त्यामुळे चालूवर्षीच्या लागवडीमध्ये आम्ही पुर्णपणे 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीची संकल्पना राबवत आहे. गेल्यावर्षी पहिलाच भार असल्याने तसेच झाडांची वाढ, घेर मर्यादित असल्याने उत्पादन साधारणच मिळाले, यातील काही शेतकऱ्यांनी ५० -६० हजार रू. पर्यंत एकरी उत्पन्न मिळविले आहे. तर काहींना १५ ते २० हजार पर्यंत मिळाले.

आता दुसर बहार चालू झाला आहे. यावेळी झाडांवर २० किलोच्या आसपास शेंगांचा लोड आहे. शेंगांची लोकल मार्केटमध्ये बीड, लातूर, परळी, आंबेजोगाई, केज, माजलगाव या ठिकाणी विक्री होते. सध्या बाजारभाव मात्र कमी आहेत. १० रू. पासून १५ ते २० रू. किलो भाव मिळत आहे. गेल्यावर्षी ६० ते ७० रू. किलो होलसेल भाव मिळाला होता.

यालू परिस्थितीत आमच्या जिल्ह्यातून १ टन माल दररोज मार्केटमध्ये येत आहे. हे उत्पादन २० ते २५ टनापर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीची वाटचाल चालू आहे.

New Articles
more...