मोरिंगा शेवगा आरोग्याचा दागिना तर गरिबांना अलिबाबाची गुहा


श्री. अब्दुल गुलाब मुलाणी, मु.पो.राजाचे कुर्ले, ता.खटाव, जि.सातारा

मी पुणे येथे आलो असता, शेवगा लागवडीची माहिती सरांनी सांगितली त्या माहितीच्या आधारे आपल्या तंत्रज्ञानाने पिशव्या तयार करून ७ जूनला मोरिंगा शेवग्याचे बी जर्मिनेटरमध्ये भिजवून लावले. २ दिवसाआड झारीने पाणी देत होतो. १५ जुलैला रोपांची ३० गुंठ्यामध्ये लागवड केली. जमीन मुरमाड असल्याने पाणी आठवड्याच्या अंतराने पाटाने देत होतो. १ महिन्याच्या अंतराने पंचामृत फवारणी करीत होतो. त्यामुळे झाडांची वाढ चांगल्या प्रकारे झाली. झाडे २ - २।। फुटाची असताना झाडांची छाटणी केली. जमीन मुरमाड म्हणजे चप्पल शिवाय चालता न येणारी अशी या जमिनीत ५ व्या महिन्यात फुलकळी लागली. शेंगा इतक्या जबरदस्त लागल्या की काही झाडास ४०० ते ५०० शेंगा होत्या.

झाडाला ८ दिवसाच्या अंतराने पाणी देण्यापेक्षा १०-१२ दिवसांनी दिल्याने काही झाडाची वाढ खुटते. पण पंचामृत फवारणी व कल्पतरू खत देत असल्याने शेंगा लोंबत्या अशा लागल्या की, त्या खाली जमिनीला टेकत होत्या.

अगोदर आई वडिल या बियाच्या लागवडी विषयी तुला काय करायचे ते कर परंतु आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार नाही, आम्हाला गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे म्हणत होते आणि आता मात्र तेच बी आम्हाला आण असे सांगत आहेत. कारण या पिकला कुठलीच रोगराई नाही शिवाय अवघ्या १० महिन्यात शेंगा आलेल्या असून तोडणीचा त्रास नाही. शिवाय भाव ८ ते १० रू. किलो मिळत होतो. त्यामुळे इतर टोमॅटो, वांगी यासारखे त्रासदायक पीक नसून उत्पादन भरपूर व बाजारभाव चांगला मिळत आहे.

मी कल्याणी फोज कोरेगांव भिमा ता. शिरूर, जि.पुणे येथे नोकरी करीत असून आई-वडिल हे राजाचे कुर्ले (गावी) येथे आहेत आणि आता उन्हाळा असल्याने आम्हाला शेवग्या व्यतिरिक्त कुठलेच काम नाही. त्यासाठी हेच बी आणायला सांगितले कारण पहिल्या पिकाचे उत्पादन यशस्वीरित्या आल्याने आजुबाजूचे शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे त्याचे महत्व वाढल्याने प्लॉट लावण्यासाठी शेवगा बी मागवत आहेत.

टोमॅटो सरखे पीक आमच्या भागात प्रचलित आहे. पण त्याला बांधणी, सुतळी, तारा इत्यादी खर्च तसेच तोडणी, पॅकिंग करणे अवघड जाते. मात्र शेवगा करायला सोपा. तोडणी सोपी, पॅकिंग सोपी, शिवाय रोगराई नाही.

पॅकिंगचे अर्थशास्त्र - टोमॅटो जर पॅक करायचा झाला तर खोके २७ रू. चे, शिवाय त्यात २० किलोच माल बसतो. तसेच वाहतूक २० रू. खर्च, एवढे करून भाव जर ४ रू. किलो सापडला तर बियाणे, बांधणी, सुतळी, तार याचा खर्च १ रू. ७० पैसे आणि पॅकिंगचा खर्च ७० पैसे वाहतूक तसेच खत पाणी मजूरी, यांचा साधारण किलोला ३ रू. खर्च येतो. म्हणजे १ किलोला ५ रू. ४० पैसे येतो. म्हणजे ही पडतळ वर्षातून १५ दिवस पडते आणि उरलेले ३५० दिवस शेतकरी डब्यात जातो.

पॅकिंगचे व्यस्त अर्थशास्त्र- ज्यावेळेस टोमॅटोचे भाव वाढतात त्यावेळी शेतकरी अधिक लागवड करतात. व उत्पादन आधिक येते त्याला खोके अधिक लागतात. ज्यावेळी टोमॅटो मार्केटला येतात तेव्हा भाव कोसळतात व खोक्याचे भाव वाढतात आणि अशा रितीने शेतकरी टोमॅटोचे कमळ तोडायला गेलेला शेतकरी १ पाय चिखलात घालतो व दुसरा टोमॅटोच्या कोसळलेल्या भावाच्या आणि पॅकिंगच्या वाढलेल्या खर्चात म्हणजे मृगजळाच्या खोलात जातो.
याउलट शेवग्याच्या पॅकिंगचा खर्च.

भोत किंवा किलताना भिजवणे, किलतानाच्या दोन्ही बाजूने शेंगा सारख्या रचत जाणे अशा पध्दतीने २० किलोचा कट्टा केला तर त्याला वाहतूक खर्च २० रू. आणि ६० ते ७० किलोचा कट्टा केला तरी तेवढाच खर्च येतो. म्हणजे १ किलोला वाहतुक २० ते २२ पैसे पडतात. आणि कांद्याच्या मोठ्या भोताची किंमत ५ ते ७ रू. असते. शेवग्याचा ५० किलोचा कट्टा किंवा पडवळाचा ५० किलोला कट्टा हे भाडे वजनावर नसून नगावर असते आणि म्हणून शेवग्याचा दर ७ ते ८ रू. असता तरी परवडतो. पॅकिंग व वाहतुकीला १ किलोला ३० ते ३४ पैसे खर्च येतो. भाव गुजरातचा माल आला तरच ढासळतो. अन्यथा २० ते २२ रू. किलोपर्यंत भाव या तंत्रज्ञानाने अनेक शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्यांचे अनुभव कृषी विज्ञानमध्ये छापले आहेत "शिवाय या शेवग्यापासून असे आढळले की, या पिकला सतत वर्षभर पानोपानी शेंग आहे. त्यामुळे त्याची दुसर्‍यांदा छाटणी केव्हा व कशी करावी" मुलाणी.

"जेव्हा हलकी जमीन, पाण्याचा ताण, सप्तामृत व कल्पतरूचा वापर आणि बाराही महिने शेंगा येतात आणि झाडाची उंची आखुड (मर्यादित) ५ फुटापर्यंत असेल तर शेवग्याची दुसरी छाटणी करण्याची आवश्यकता नसते" सर शेवगा दुसर्‍यांदा केव्हा छाटावा लागतो ?

झाडांची उंची ५ फुटापेक्षा जास्त होऊन म्हणजे काळी जमीन,टोमॅटो, आले, हळद, उसासारखे खादाड पीक अशा जमिनीत न कल्पतरू टाकता न सप्तामृत फवारता शेवग्याला शेंगा न लागता नुसता माजतो. अशावेळी छाटणी करावी. परंतु माझा शेवगा प्रतिकुल परिस्थिती असूनही उच्च तंत्रज्ञान वापरल्याने सतत फुले लागून शेंगा लागत असल्याने यंदा आम्हाल छाटावा वाटत नाही. म्हातारे आई-वडिल शेवगा लागवड करताना तोंड लपवायला जागा गावात राहणार नाही असे म्हणणारे काहीही कर पण सरांचाच शेवगा बी सप्तामृत आण, असा हट्ट धरून बसले. शेवगा हा आरोग्याचा दागिना आहे आणि गरिबांना तो अलीबाबाच्या गुहेसारखा आहे.

आज आपल्या येथून मोरिंगा शेवग्याची ११ पाकिटे आई वडिलांच्या अनेक निरोपावरून घेऊन जात आहे.

New Articles
more...