सरांचा मोरिंगा शेवगा मित्राचा जीवन आधार

डॉ.पुंडलिकजी राजपुत, रा. मोड, ता. तळोदा, जि.नंदुरबार फोन:(०२५६७)२३६२६४

मी दोन वर्षपूर्वी मोडला माळी गुरूजींकडे गेलो होतो. तेथे कृषी विज्ञान मासिक वाचायला मिळाले. गुरूजींशी या मासिकासंबंधी चर्चा करून त्यांच्याकडील ६ मासिके घेऊन गेलो. ते अंक वाचल्यानंतर मी या विज्ञानाकडे आकर्षित झालो. पहिल्याच वर्षी या विज्ञानाने अर्धा एकर कारल्यापासून ३५ हजार रुपये उत्पन्न मिळाले.

माझे मित्र लच्छुभाई गोरख हे शहाद्यावरून औषधे आणतात. त्यांच्याकडे २० - २५ एकर जमीन होती. परंतु कर्जबाजारी पणाने त्यातील फक्त २ एकरच जमीन राहिली. त्यात सरांशी त्याची भेट झाली. त्यावरून त्याने १ एकरमध्ये मोरिंगा शेवगा लावला. त्या शेवग्याला ७-८ महिन्याने शेंगा लागल्या. तळोदा, शहादा, नंदुरबार येथे हा शेवगा हात विक्रीने विकला. काही माल पुणे मार्केटला आणला होता. तर या शेवग्यापासून त्यांना इतका फायदा झाला की, त्यांची ५ मुले व नवरा बायको असे ७ लोकांचे कुटूंब हे केवळ शेवग्यावर जीवन जगत आहेत. हा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव गेले २ वर्षे मी पाहत आहे. हे विज्ञान प्रत्येक गावामध्ये एका शेतकर्‍याने जरी वापरले तरी गावातील सर्व लोक प्लॉट पाहून अतिशय उत्पादन आल्याने या विज्ञानाने दर्जेदार उत्पादन मिळवून राष्ट्रीय उत्पन्नात भर पडेल. आमच्या दुर्गम भागात हे विज्ञान शेतकर्‍यांना माहित नाही.

तेव्हा मी सरांना विचारले की, विज्ञान इतके चांगले असूनही आदिवासी भागामध्ये का पोहचत नाही? तेव्हा सरांनी सांगितले की मैल्याचा वास मैलावरून येतो. तर आत्तराचा वास जवळ गेल्यावरच येतो. याचा अर्थ वाईट गोष्टींचा प्रचार हा वनव्या सारखा होतो. पण चांगल्या गोष्टी रुजायला, अनुभवायला वेळ लागतो असा होय.

New Articles
more...