मोरिंगा शेवग्याने माझ्या जीवनात क्रांती केली



श्री. दत्तात्रय बाबूराव पिसाळ (प्राथमिक शिक्षक), मु.पो. ओझर्डे, ता. वाई, जि.सातारा.

मी प्राथमिक शिक्षक असून नोकरीमुळे मला शेतात लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यात मजूरांचा प्रश्न.ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी दोन वर्षपूर्वी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा प्रथम १८ गुंठे शेवगा लावला. पहिल्या बहाराला ४०,००० चे आसपास रुपये मिळाले. त्यानंतर गेल्यावर्षी १ एकर कॅनॉल जवळील शेतात व १० गुंठे घराजवळील शेतात आपलाच 'सिद्धी विनायक' मोरिंगा शेवगा लावला. दोन वर्षाचा खोडवा व नवीन सव्वा एकर शेवग्यावर न चुकता दर पंधरा दिवसांनी सप्तामृत औषधांचा स्प्रे घेत होतो. त्यामुळे झाडाला सरासरी ३० किलो पर्यंत माल मिळाला. स्लॅक सिझन असून व मार्केटमध्ये शेवग्याचे दर ४ रू. ते ५ रू. असूनही पहिल्या वर्षीच्या लागणीत एकूण ८० ते ९० हजाराच्या आसपास उत्पन्न मिळाले. एकूण १५ ते २० टन माल मिळाला. हे सर्व उत्पन्न मिळविण्यासाठी मला वर्षाला ४ ते ५ हजार रू. खर्च आला. हेच जर दर चांगले असते तर लाखाने रुपये मिळाले असते. हे सर्व मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शक्य झाले. शेवग्याच्या दुसर्‍या बहराचे आतापर्यंत ३५,००० रू. झाले आहेत.

New Articles
more...