प्यायला पाणी नसताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वी!
श्री. निलेश विठ्ठल तराळ, मु.पो. तराळवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर. मोबा. ८४२१०८८४४८
मी प्रथमच आमच्या २।। एकर शेतात 'सिद्धीविनायक' मोरिंगा लावण्याचे ठरविले. सुरुवातीला नारायणगाव सेंटरवरून शेवगा बियाची ९ पाकिटे आणली. पिशवीत रोपे तयार करून दिड महिन्याने लागण केली. त्यासाठी सुरुवातीला कल्पतरू सेंद्रिय खत व शेणखत टाकले. त्यानंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर फवारले. झाडांचा एकदम जोमाने फुटावा होऊन खोडाचा घेर वाढला. आता ५ महिन्याचे पीक झाले असून प्लॉट एकदम चांगला आहे. सध्या प्रत्येक झाडावर भरपूर फुले लागली असून २०० ते २५० लहान - मोठ्या शेंगा लागलेल्या आहेत.
कमी वयात शेततळे केले
माझी यशोगाथा म्हणजे माझी जमिन मध्यम प्रकारची असून आमच्या भागात पाणी एकदम कमी आहे, त्याकरिता मी शेततळे करण्याचे ठरविले. त्यासाठी बँकेचे कर्ज काढून मी शेततळे केले. कर्जाकरीता माझे वय कमी असल्यामुळे बँक कर्ज देत नव्हती. परंतु माझी जिद्द मी सोडली नाही.
बँकेचे अधिकारी 'सिद्धीविनायक' शेवग्याचा प्लॉट बधून खूष
बँकेच्या अधिकाऱ्यांना प्लॉटवर आणून दाखविले 'सिद्धीविनायक' शेवग्याचा प्लॉट पाहून अधिकारी अवाक झाले. ते म्हणाले कमी वयात तु हे करून दाखविले त्यामुळे त्यामुळे आम्ही खूष आहोत. आज रोजी माझ्या प्लॉटवर खूप लोक येतात, शेवग्याच्या झाडांना लागलेली फुले व शेंगा पाहून एकदम अवाक होतात. सुरुवातीला शेवगा लावताना लोक मला हसायाचे, परंतु आज प्लॉट पाहून ते अचंबित होतात. आमच्या भागात प्यायला पाणी नसताना मी हे फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरूनच करू शकलो.
यासाठी वेळोवेळी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी नारायणगाव शाखेतून मार्गदर्शन मिळाले.