"सिद्धीविनायक" शेवग्याच्या अनुभवातून परत सव्वा
एकरात नवीन लागवड डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने
श्री. रामदास आण्णासो गावडे, मु.पो. गुणवरे, ता.फलटण, जि. सातारा. मो.९७६३०६९०२५.
डिसेंबर २००३ मध्ये कृषी प्रदर्शनात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व 'सिद्धीविनायक ' मोरिंगा
शेवग्याबदल महिती मिळाली. त्यावरून लगेच तेथून शेवग्याची सहा पाकिटे (१०० बियाची) आणि
जर्मिनेटर २५० मिली घेऊन गेलो. बियाला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून पिशव्यामध्ये
रोपे तयार केली. ही रोपे एक महिन्यात लागवडीस आली.
जानेवारी २००४ मध्ये मध्यम प्रतीच्या जमिनीत १०' x ८' वर लागवड केली. जुलै २००४ मध्ये
झाडांची उंची ६ ते ८ फूट झाली होती. फुलकली ५ व्या महिन्यात लागून ७ व्या महिन्यात
तोडे चालू झाले. सर्वे शेंगा फलटण, वरड, गुणवरे, निंबळक या बाजारामध्ये हात काट्यावर
१५ ते २० रू. किलो प्रमाणे विकत होतो. उत्पादन भरपूर मिळाल्याने बर्यापैकी पैसे झाले.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा औषद्यांच्या फवारण्या करू शकलो नाही, नाहीतर अजून उत्पन्न
मिळाले असते. फक्त किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाची दर महिन्याला फवारणी घेत असे.
आतापर्यंत ५ बहार घेतले आहेत. या अनुभवावरून पुन्हा नवीन लागवड करण्यासाठी २८/१२/०७
रोजी शेवग्याच्या बियाची १० पाकिटे घेऊन गेलो होतो. सध्या भर (माल) चालू असून या प्लॉटला
पूर्ण डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे. त्यासाठी सप्तामृत घेऊन जात आहे.