"सावकारी कर्जाच्या विळख्यातून सरांचा सिद्धीविनायक शेवगाच तारेल" - आईचा आत्मविश्वास

श्री. दत्तात्रय बच्चू गाढवे, (एम ए.इंग्लिश) मु. पो. चखालेवाडी, ता.कर्जत, जि.अ.नगर. मो.(पी.पी. सुभाष खटके)९२२६७३६४०३

माझ्याकडे अतिशय हलकी जमीन आहे, की ज्यामध्ये कोणतेही पीक घेऊ शकत नव्हतो. मात्र त्या जमिनीत मी सरांच्या सल्ल्यानुसार 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची लागवड केली, बीजप्रक्रियेसाठी जर्मिनेटर व प्रोटेक्टंट पावडर वापरली. तेव्हा उगवण १००% झाली. लागवड १० x ८ फूटवर केली. लागवडीसाठी शेणखत एक पाटी आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५० ग्रॅम प्रत्येक झाडास टाकले. झाडांची वाढ २ ते ३ महिन्यात चांगली झाली. ५ व्या महिन्यांत फुले लागली व आठव्या महिन्यांत तोडणी सुरू झाली. पहिला तोडा १ क्विंटल निघाला. पहिल्या वर्षी पाणी कमी मिळाल्यामुळे उत्पादन म्हणावे तसे भेटले नाही.

मात्र चालू वर्षी (डिसेंबर ०६ ते फेब्रुवारी ०७ पर्यंत) अर्ध्या एकरात २०,००० रू. उत्पन्न मिळाले. अजूनही १०,००० रु. उत्पन्न मिळण्याची खात्री आहे चलू वर्षी आठ दिवसाला तोडणी करून आतापर्यंत १५ ते २० क्विंटल माल निघाला. हा माल मार्केटयार्ड, पुणे येथील मे. कानिफनाथ ट्रेडर्स, गाळा नं.८५७ आणि गनीभाई दगडूभाई आणि कंपनी, गाळा नं . २०६ चांच्याकडे डिसेंबर २००६ मध्ये ३५ रू. किलो दराने विकला. त्यानंतर भाव कमी-कमी होत चालले असून सध्या (फेब्रुवारी ०७) मध्ये १८ ते २० रू. किलो बाजारभाव टिकून आहेत.

माझ्यावर सावकारी कर्ज आहे. मासिक शेकडा ५% व्याजाने कर्ज उचलले आहे. कारण बँकेचे कर्ज भेटत नाही. विविध कारणांमुळे. परंतु ज्या गरजूंना बँकेकडून कर्ज पाहिजे त्यांना बँक कर्ज देत नाही आणि गरज नसलेल्यांना कर्ज देते. त्यामुळे सावकारी कर्ज काढावे लागते. त्यामुळे येणारे उत्पादन हे संपूर्ण व्याजामध्ये गडप होते. वरील झालेले २०,००० रू. उत्पादन संपूर्ण व्याजापोटी गेलेले आहे. त्यामुळे सध्या मी पूर्णपणे अडचणीत आहे.

आज रोजी मी आर्थिक अडचणीत असल्याने मोरिंगा शेवगा मला पूर्णपणे तारणार आहे. अशी खात्री आहे. तसेच पहिल्या वर्षी ३६ रू. किलोप्रमाणे शेवगा गेला. त्यावेळेस माझ्या बोरमध्ये पाणी देण्यासाठी मोटार नव्हती. त्यावेळी आई म्हणाली, "जरी पूर्वीचे कर्ज असेल तरी आणखी कर्ज काढून बोअरची मोटर बसव." कारण सरांचा शेवगाचा आपल्याला तारणार आहे, अशी आईची सुद्धा खात्री पटली आहे. म्हणून नवीन मोटर बसवली, परंतु विजेच्या भारनियमनामुळे शेवग्याच्या झाडांना १५ मिनिटे सुद्धा पाणी देता येत नाही, म्हणून शेवग्याला पेप्सीची पट्टी वापरून ठिबक केलेले आहे.

माझो हे आत्मकथन सरांना सांगताना अक्षरक्षः माझ्या डोळ्यांत अश्रू आले. मी कर्जाच्या ओझ्याखाली पूर्ण दबलो गेल्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार करत आहे. तेव्हा सरांनी सांगितले तसे करू नकोस. तेवढयात श्री. सावंत यांचा मुंबईवरून सरांना फोन आला, "त्यांच्या काजूच्या बागेला शनिवार दि. १७-२-२००७ रोची आग लागून झाडे जळाली होती. तेव्हा सरांनी सांगितले की. १ लि. सप्तामृत औषधे व कल्पतरू सेंद्रिय खत (१ किलो /झाड) बागेला देऊन लगेचच हलके मध्यम सर्वसाधारण ४-४ दिवसांच्या अंतराने पाणी द्या. म्हणजे नवीन पालवी फुटन झाडे हिरवी होतील आणि पुढच्याच वर्षी खात्रीशीर बागेतून १ लाख रू. उत्पन्न निघणार असे सरांनी सांगितले.

त्यावरून मला प्रचीती आली कि, जर त्या शेतकर्‍याची बाग जळून सुद्धा उत्पादन मिळत असणार तर मला पाण्यावाचून शेवग्याचे उत्पादन नक्कीच मिळणार अशी खात्री पटली आहे. त्यामुळे मी खचून न जाता सरांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या दुःखाश्रूचे रूपांतर आनंदाश्रूमध्ये होईल आणि माझ्या मनातील आत्महत्येचा विचार क्षणाधार्त नाहीसा झाला. तसेच सरांना भेटून व माझ्या व्यथा सांगितल्यावर मला मानसिक शांती व नैतिक वळकटी आली आहे. मला बँके ला असे सांगावेसे वाटते की, "माझ्यासारखा शेतकर्‍यांना कर्जाची मदत जर केली तर सावकारी कर्जामुळे ज्या आत्महत्या होतात ती वेळ शेतकर्‍यांवर येणार नाही, याची खात्री आहे." तरी कृपा करून शेतकर्‍यांसाठी बँकांनी मदतीचा हात पुढे करावा. कारण सरांचा मोरिंगा शेवगा खात्रीशिर उत्पादन देणारा असल्यामुळे बँकांनी शेवग्यासाठी 'पीक कर्ज' देऊन शेतकर्‍यांना मदत करावी. सरांची व माझी भेट दि. २१ फेब्रुवारी २००७ रोजी ११ ते १२ या वेळेत झाली.

''सिद्धीविनायक' शेवग्याने
मला शेती करण्याचे दिले बळ


माझ्याकडे तीन एकर जमीन हलकी, प्रतीची असून त्यातील २ एकर क्षेत्रासाठी आठमाही पाण्याची सोय आहे, तर १ एकर पूर्ण कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पीक घेण्यासाठी मामांची अर्धोलीने २ एकर जमीन घेतली आहे. त्यांना बारमाही पाण्याची सोय आहे. मामचे गाव (कवडाने) आमच्या गावापासून जवळच असल्याने जाऊन येऊने शेती करता येते.

या क्षेत्रामध्ये १० गुंठ्यात काकडी २० गुंठ्यात टोमॅटोची लागवड करायची आहे त्यासाठी आज विजयात टोमॅटो बियाची २ पाकीटे आणि जिप्सी काकडी बियाचे एक पाकीट तसेच बीजप्रक्रियेसाठी जर्मिनेटर १०० मिली घेऊन जात आहे.

माझ्या आठमाही क्षेत्रातील अर्धा एकरमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची लागवड २ वर्षपुर्वी केली आहे. ह्या शेवग्याच्या शेंगा अतिशय उत्कृष्ट प्रतीच्या असल्यामुळे ३५-३६ रू. किलोचा भाव मिळत आहे. पहिल्या बहाराला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या तीन फवारण्या फुले लागण्यास सुरुवात झाल्यानंतर १५ ते २१ दिवसांच्या अंतराने केल्या होत्या. त्यमुळे खराब हवामानातही चांगले उत्पादन मिळाले. दुसर्‍या बहाराला ही औषधे वापरू शकलो नाही. सध्या झाडांवर शेंगा भरपूर आहेत. मात्र शेंगांचा हिरवटपणा थोडा कमी झाला आहे, त्यामुळे तिसर्‍या बहाराला पूर्ण तंतज्ञान सुरूवातीपासून वापरणार आहे.

New Articles
more...