शेवगा आरोग्याच्या दृष्टिकोनातून
डॉं .श.म. साठ्ये, मां .अधिष्ठाता,पोतदार मेडिकल कॉंलेज, मुंबई. फोन:(०२०) २५३८०१४६
अलीकडे असे ऐकले की शेवगा खाण्याने कावीळ होते पण ही चुकीची समजूत आहे. शेवगा हा उष्ण
आहे हे खरेच पण त्याचा उपयोग विशेष करून वात किंवा कफ विकारावर होतो. याच्या कोवळ्या
पानांची व फुलांची आणि शेंगांची भाजी करतात. याच्या शेंगा आमटीत वापरतात.
शेवगा तिखट, उष्ण आहे तसेच दीपक पाचक आहे. त्यमुळे आतड्यांचा क्षोभ होऊन त्याबाजूस
रक्तप्रवाह अधिक होतो. पाचक रसाचा स्त्राव उत्तम होऊन अग्निमांद्यावर चांगला उपयोग
होतो.
शेवगा दोन प्रकारचा आहे. पांढरा व काळा, यापैकी काळा जास्त उग्र आहे. याच्या मुळाच्या
सालीची पावडर २ ते ३ ग्रॅम प्रमाणात अधून मधून येणारा ताप, फिट्स हिस्टेरिया, जुनाट
संधिवात, सूज, जुलाब, खोकला, दमा आणि पंथारी वाढली असता वापरावी.
शेवग्याच्या सालीचा वास उग्र असतो.शेवग्याच्या सालीचा काढा हा रोगात वापरतात. अग्निदिपनासाठी
शेवग्याच्या पानांचा किंवा शेवग्याच्या शेंगांचा वापर भाजीच्या स्वरूपात जेवणात करतात
शेवग्यामुळे पोटात आग पडते. मिरे आणि मोहरी यांच्याप्रमाणे शेवग्यामुळे विदाह होतो.
हे पदार्थ वारंवार खाण्याने पित्त व रक्त बिघडते आणि.(नाक, तोंड, गुद,मुत्र) शरीरातून
रक्त बाहेर येते.
शोभांजन (शेवगा) शरीराच्या आतील व बाहेरील सूजेवर अतिशय प्रशस्त सांगितला आहे. शेवग्याच्या
सालीचा काढा यकृतात आलेल्या सूजेवर देखील पिण्यास योग्य आहे. प्लीहा वाढली असता शिग्रत्वचेचा
काडा, चित्रक, पिंपळी, यवक्षार यांचे सहित घ्यावा. मूतखडा झाला असता शेवगा हा उपयुक्त
ठरतो. त्यामुळे लघवीवाटे तो बाहेर पडतो. शेवग्याचे बी (चूर्ण) नाकपुड्यात घातल्यास
डोकेदुखी आणि डोक्याचा जडपणा नाहीसा होतो. नाकातून पू येत असल्यास शेवग्याच्या पानांच्या
रसाने सिद्ध केलेले तेल नाकात घालण्यासाठी वापरावे.
शेवग्याचा पानांचा रस आणि मध मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) झालेल्या रोग्यांसाठी प्रशस्त आहे.
शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी खावी.
शेवग्याच्या झाडाची पाने सुज कमी करणारी कृमिनाशक, डोळ्यांना हितकारक आणि व्हिटेमिन
ए व सी भरपूर प्रमाणात असलेली आहेत.
याच्या पानांचा काढा करून दिल्यास उचकी व दम्यावर चांगला उपयोग होतो. जीभ लुळी पडल्यास
शेवगा पोटात घ्यावा. कान वहात असेल तर याची फुले सावलीत वाळवून त्यावे वस्त्रगळ चूर्ण
करून कानात घालावे. गळू झाले असल्यास त्यावर याची साल उगाळून लावल्यास गळू जिरते. असे
अनेक औषधी उपयोग ह्या शेवग्याचे आहेत तेव्हा वैद्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा
जरूर उपयोग करा.
Click here (http://en.wikipedia.org/wiki/Moringa_oleifera) or here (http://mr.wikipedia.org/wiki/शेवगा) to know more about Moringa on Wikipedia