शेवग्याचे शेंडे छाटणे फार महत्वाचे

श्री.संजय मारुती घोरपडे, मु.पो. निसराळे, ता.जि. सातारा. मो.९८६०५३५१४४

'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याच्या बियांचे सुरुवातीस ७ पाकिटे आणि नंतर आठवड्याने १० पाकिटे घेऊन गेलो होतो. बियासोबत जर्मिनेटर, कल्पतरू खत आणि रोपांच्या पिशव्या नेल्या. तत्पूर्वी शेवगा लागवडीचे पुस्तक नेले होते. पुस्तकात दिल्याप्रमाणे बीजप्रक्रिया करून पिशवीत २-२ चमचे कल्पतरू सेंद्रिय खत देऊन बी लावले. तर आठवड्यात बियाची ९०% उगवण झाली. बी ऑगस्टमध्ये लावले होते. सध्या १५०० रोपे लागवडीस तयार आहेत. तेव्हा सरांचा सल्ला आणि लागणारे तंत्रज्ञान घेण्यासाठी आलो आहे. सरांनी सांगितले, "शेवग्याची लागवड ८'x ८' फुटावर सरीच्या बगलेत खोर्‍याने (फावड्याने) साधारण १'x १'x १' आकाराचा खड्डा घेऊन १ घमेले पूर्ण कुजलेले शेणखत आणि ५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत देऊन खड्डा भरावा. नंतर पाटाने पाणी देऊन खड्डे ओले करून वाफश्यावर रोप बसेल एवढी खड्ड्यातील माती काढून रोपाची प्लॅस्टिक पिशवी ब्लेडने अलगद फाडून रोप त्या खड्ड्यात लावून माती टाचेने घट्ट दाबावी लागवडीच्या आदल्या दिवशी सप्तामृत प्रत्येकी ३ मिली प्रती १ ली. पाणी याप्रमाणे दाट फवारणी करावी आणि रोप लागवडीनंतर वाफश्यावर वरील प्रमाणे द्रावण प्रत्येक रोपावरून ५० मिली सोडावे. म्हणजे रोपे लगेच रुजतील. पांढऱ्या मुलीचा जारवा वाढेल. रोपे मरणार नाहीत.

लागवडीनंतर महत्वाची बाब म्हणजे शेवग्याची छाटणी-रोपांची लागवड केल्यानंतर २ ।। फुटावर शेंडा खुडावा. त्यानंतर वेगवेगळ्या दिशेला ४-५ फांद्या फुटल्यावर मुख्य शेंडा आठवड्यातून ३ वेळा तर बाजूच्या फांद्या आठवड्यातून किमान १ ते २ वेळा छाटाव्यात. हे शेंडे ४ ते ६ आठवडे मारल्यावर ६ ते ७ फांद्यातून बारीक-बारीक ५ ते ६ तुरे बाजरी -ज्वारीच्या आकाराचे येतात. मग छाटणी बंद करावी. कारण त्यानंतर अन्नरस तयार होऊन तो तुर्‍यांना (फुलांना) मिळून शेंगा लागतात.

New Articles
more...