शेवग्याच्या वेगवेगळ्या भागातील घटक व उपयोग
शेंगा : शेवग्याच्या शेंगामध्ये पाणी ८६.९%, प्रथिने २.५ %, मेद ०.१%, कर्बोदके
३.७% , तंतू ४.८.% , खनिजे २.०%, ऑक्झॉंलिक आम्ल ०.०१% असते. १०० ग्रॅम गरामध्ये ३०
मिलीग्रॅम कॅल्शिअम, ११० मिलीग्रॅम फॉंस्फारस आणि ५.३ मिलीग्रॅम लोह असते.
रदय, पक्षाघात, मिरगी, अर्धांग, लकवा जुन्या गाठी, रक्तसंचार या रोगांवर उपयुक्त. स्नायू
आडकणे, स्नायू कमजोरी, उदरवायू तसेच पित्ताशयाचे (लिव्हर रोग), टेटॅनस, सांध्याच्या
वेदना यांवर उपयोगी आहेत. शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने रक्ताभिसरणाला उतेजन
मिळते. शेवग्याच्या शेंगाने पोटातील जंत कमी होतात.
पाने: शेवग्याच्या पानांमध्ये पाणी ७५.०%,प्रथिने ६.७%, मेद १.७%,कर्बोदके १३.१%,
तंतू ०.९%, खनिजे २.३% असते. १०० ग्रॅम पानात केल्शिअम ४४० मिलीग्रॅम,फॉंस्फारस ७.०
मिलीग्रॅम असते.
शेवग्याच्या पानात अ व क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे गळ्याची सुज, खरूज,
वांती यावर उपयुक्त ठरते. जखमेवर पानाचा लगदा बांधाल्यास आराम पडतो. पानांचा रस काढून
त्यामध्ये मध घालून अंजन केले असता डोळ्याचे रोग बरे होतात. पानांच्या रसात मिरे घालून
कपाळावर लेप दिल्याने डोके दुखी थांबते केसातील कोंड्यावर पानांच्या रसाने मर्दन करावे.
पिसाळलेले जनावर चावल्यास कोवळ्या पानांचा रस, मीठ, काळी मिरी, लसूनण, हळद यांचे एकत्र
मिश्रण पोटात देऊन जखमेवर लेप लावतात.
शेवग्याच्या पानातील प्रथिने पाचक असतात. त्यामुळे मुख्यतः भात खाणार्या लोकांनी शेवग्याच्या
पानांची भाजी करून खावी. वायुगोळयावर शेवग्याच्या पाल्याचा रस खडीसाखरेबरोबर घ्यावा.
शेवग्याचे बी: शेवग्याच्या एका बियाचे वजन ०.३ ग्रॅम असते. शेवग्याच्या बियाचे
२६ ते ३०% कवच असते आणि आतिल बी ७० ते ७४% असते.
शेवग्याच्या बीयामध्ये पाणी ४.०% प्रथिने ३८.४%, स्निग्ध तेल ३४.७% तंतू ३.४%, खनिजे
३.२% असतात. संधिवात, संधीरोग (गाठ) यावर शेवग्याच्या बियांतील तेल चोळावे. शेवग्याचे
बी तिखट व कडू असून ताप कमी करते
बियांचे तेल: तेल हे फिक्कट पिवळ्या रंगाचे, न वाळणारे मंद आल्हादकारक स्वादाचे
असते. हे तेल खाण्यासाठी, दिव्यासाठी व सौंदर्य प्रसाधनात वापरतात. इतर तेलाप्रमाणे
हे तेलही खवट बनते. ते ऑलिव्ह तेलासमान आहे. नाजूक यंत्राचे (उदा. घड्याळ) वंगणासाठी
वापरतात.
पेंड: तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पेंडीत ५८.९३% प्रथिने,०.४०% चुना,
१.०९% फॉंस्फॉंरिक असिड आणि ०.८०% पोटॅश असते. ही पेंड चवीला कडू असल्याने पशुखाद्यात
न वापरता खतासाठी वापरतात.
तसेच शेवग्याची फुले शक्तीवर्धक (टॉंनीक) व मूत्र वाढविणारी आहेत. कान फुटल्यावर शेवग्याची
फुले तिळाच्या तेलात उकळून कोमट थेंब कानात सोडावेत,त्यामुळे पू वाहणे कमी होऊन ठणक
थांबते.