शेवग्यातील आंतरपिके

दीड एकरात साडेपाच महिन्यात शेवग्यातील आंतरपीकाचे पंचाहत्तर हजार

श्री. ज्ञानोबा कृष्णाजी वरपे, मु.पो. मरकळ, ता.खेड, जि.पुणे फोन:(०२१३५) २४६११६

शेवगा बियांना जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून प्लॅस्टिक पिशवीत लावले. प्रत्येक पिशवीत कल्पतरू खताचा लहान एक चमचा मातीत मिसळून टाकला होता. बी जर्मिनेटर व कल्पतरूमुळे ७ ते ८ दिवसांनी उगवून आले उगवण ९५ % झाली. उगवून आल्यानंतर चार पाच पानावर असताना पंचामृताची पहिली फवारणी केली. त्यामुळे रोपांची मर झाली नाही. रोपे हिरवीगार व टवटवीत होती नंतर पुन्हा १५ दिवसांनी पंचामृताची दुसरी फवारणी केली त्यामुळे रोपांवर कुठलाच रोग कीड आली नाही. रोपांची वाढ एक महिन्यात एक दिड फुट झाल्यावर खड्डयात लागवड केली. खड्डयात कल्पतरू प्रत्येकी १/२ किलो घातले होते. रोपे लावतेवेळी जर्मिनेटरमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे बुडवून लावली. त्यामुळे सर्व रोपे फुटली. मर अजिबात झाली नाही.

शेवग्यातील आंतरपीक कोथिंबीर

त्याचवेळी शेवग्यात कोथिंबीर हे आंतर पिक घेतले होते. धना २० किलो जर्मिनेटरमध्ये बुडवून फेकला व नंतर पाणी दिले. धन्याची मर अजिबात झाली नाही. कोथिंबीरीचा फुटवा चांगला फुटला. कोथिंबीरीला पंचामृताची एक फवारणी घेतली. त्यामुळे तिला चमक आली ब बाजारात चांगला भाव मिळाला. २० किलो धन्याचे २२ हजार झाले.

शेवग्यात मेथीचे आंतरपीक

कोथिंबीर काढल्यानंतर मेथीचे २५ कि.बी जर्मिनेटरमध्ये बुडवून टाकले. त्यामुळे उगवण चांगली झाली. मेथी एक महिन्यात बाजारात गेली मेथीला चकाकी असल्याने व कोवळी लुसलुशीत असून फुल, शेंगाविरहीत असल्याने बाजारभाव चांगला मिळाला. मेथीचे २५ हजार रुपये झाले.

शेवग्यात आंतरपीक कांदा

कांदा ३० गुंठे केला होता. त्याचे १५ हजार झाले. नंतर कोथिंबीरचे १५ गुंठ्यात दोन तरवे घेतले. त्याचे १३ हजार झाले. आता पुन्हा कोथिंबीर टाकणार आहे. त्यासाठी जर्मिनेटर घेण्यास आलो आहे.

शेवग्याची आधुनिक तंत्रज्ञानाने यशस्वी लागवड

शेवग्याची रोपे लागावाडीनंतर एक महिन्याची झाल्यावर पंचामृत फवारणी घेतली व झाडांचा चारी बाजूला खड्डे घेऊन त्यात २५० - २५० ग्रॅम (एक झाडास १ किलो) कल्पतरू टाकले. त्यामुळे झाडांची वाढ झपाट्याने झाली. झाडांवर कुठलाच रोग आला नाही. झाडे दीड महिन्याची झाल्यावर दोन अडीच फुट उंचीची असताना पहिली छाटणी केली. छाटणीनंतर पुन्हा १५ दिवसांनी पंचामृत फवारणी घेतली व शेवग्यात आंतरपीक असल्याने रिंग पध्दतीने कल्पतरू न घालता झाडाच्या दोन्ही बाजूला खड्डे घेऊन त्यात कल्पतरू प्रत्येक झाडाला १ किलो टाकले. ३ महिन्याची झाल्यानंतर झाडाची उंची ५ फुट ठेवून वरून छाटणी केली (खोडाची जाडी वाढावी म्हणून) १ -१ महिन्याच्या अंतराने आतापर्यंत चार वेळा कल्पतरू टाकले आहे. झाडे आता साडेपाच महिन्याची आहेत. झाडांना फुलकळी आली होती मात्र वातावरण खराब असल्याने गळ झाली होती. त्यामुळे पंचामृताची फवारणी घेतली. आता झाडाला फुलकळी भरपूर लागली आहे व शेंगा लहान लहान वाध्या लागल्या आहेत. ५ झाडे वार्‍याने मोडली होती म्हणून सहा फुट उंचीचे बांबू झाडाशेजारी लावून सगळ्या झाडांना आधार दिला आहे. ती पाच झाडे पुन्हा फुटून आली आहेत. ती तीन फुट उंचीची आहेत. सुकवा लागून तीन झाडे सुकली होती त्यावर सरांनी संगितल्याप्रमाणे जर्मिनेटरचे द्रावण खोडावर ओतले त्यामुळे त्या तिन्ही झाडांना चांगली फुट आली आहे.

शेवग्याला शेंगा येईपर्यंत जमीन पडून न राहता आंतरपीके घेतल्यामुळे व सरांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मला दीड एकर क्षेत्रात साडेपाच महिन्यात ७५ हजार रुपये झाले.

आधुनिक तंत्रज्ञानाने शेवग्यात वांग्याचे आंतरपीक

श्री. शामराव सोपान आल्हाट, मु.पो. मोशी, ता.हवेली, जि. पुणे फोन:(०२०) २७१२१८६३

आमचे एकूण ४५ माणसांचे एकत्र कुटुंब आहे. सर्व सुशिक्षित. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक अशी प्रतिष्ठित व्यवसाय करणारे घरचे सदस्य असूनही शेतीची सर्वानाच आवड आहे. प्रत्येक रविवारी ही आमची मंडळी शेतात आवडीने नुसते लक्ष घालत नाहीत तर जातीने सर्व कामे करतात कारण त्यांना श्रमाची, प्रतिष्ठेची जाण आहे. शेती हा आमचा परंपरागत व्यवसाय न विसरलेला असल्याने.

एकूण १५ एकर क्षेत्र आहे. जमीन तशी हलकीच. पाण्याचा प्रॉब्लेम असल्याने अडचणीत, इंद्रायणी नदीवरून ७ कि.मी. अंतरावरून पाईपलाईन करून ७ एकर बागायती क्षेत्र केले. मी व माझही मंडळी (पत्नी) मात्र शेतीची पूर्ण आवड असल्याने आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने शेती करीत आहे.

आधुनिक कृषी तंत्रज्ञान वापरून बटाटा, उन्हाळी भुईमूग, टोमॅटो, वांगी आता दोडका अशी पिके घेत असतो.

शेवगा लागवड -

स्वतंत्र भाजीपाल्याची विक्री यंत्रणा राबवीत असल्याने कोणत्या भाजीपाल्याला, पिकला मार्केट आहे याची माहिती असल्याने व त्याचबरोबर पंचामृत तंत्रज्ञानाच्या मोरिंगा शेवग्याविषयी माहिती मिळाल्याने मोरिंगा शेवगा बी पुण्यातून (डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे) मागवून अर्धा एकर क्षेत्रावर लागवड केली.

बी लावताना जर्मिनेटरचा वापर केला. पंचामृत औषधांची फवारणी केली. वेळेवर छाटणी केली. जीवाणू खताचा वापर कृषी विभागातील अधिकार्‍यांच्या सल्ल्याने केला. शक्यतो रासायनिक खते आम्ही कोणत्याच पिकास वापरीत नाही. सेंद्रिय खताचा वापर अधिक, माती परिक्षणांनुसार आवश्यक तेवढ्याच रासायनिक खताचा वापर करतो. आंतरमशागतीची काळजी व्यवस्थित घेतो. या शेवग्याची लागवड व्यवस्थित व चांगली झाल्याने आंतरपीक म्हणून अजय-वांगी केली. त्याला पंचामृत औषधांच्या फवारण्या केल्या होत्या. त्याचेही उत्पादन चांगले मिळाले. या वांग्यास ७० ते ८० रू. दहा किलो पेक्षा अधिक दर मिळाला त्यामुळे चांगले पैसे मिळाले.

शेवग्याला फुले भरपूर लागलेली आहेत

पंचामृत तंत्रज्ञानाने शेवगा व आंतरपीक वांग्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने इतर पिकापेक्षा शेवगा लागवड फायदेशीर आहे असा माझा अनुभव आहे व पुढे शेवग्याचे क्षेत्र वाढविण्याचे ठरविले आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे मार्गदर्शन, कृषी विभागातील अधिकार्‍यांच्या शिफारशी व माझी स्वत:ची आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबद्दल आवड या त्रिसुत्रीमुळे असे प्रयोग यशस्वी होत आहेत व या प्रयोगाचे मार्गदर्शन इतरांनाही मी करीत आहे. या नवनवीन यशस्वी प्रायोगांमुळे माझा शासनानेही दोन वेळा सन्मान केला आहे.

शेवग्यात भुईमुगाचे आंतरपीक

श्री. हनुमंत शंकरराव भोईटे, मु.पो. वाघोली, ता. कोरेगांव, जि. सातारा

मी आपल्या कृषी सेवा केंद्रातून मोरिंगा शेवग्याचे बी घेऊन लागण केली. लागण करतेवेळी जर्मिनेटरमध्ये बी भिजवून दुसर्‍या दिवशी २७/५/२००० रोजी टोकले. उगवणशक्ती चांगल्या तर्‍हेची झाली. ९ इंच वाढ झाल्यावर दि. १६/६/२००० रोजी कल्पतरू खत खड्ड्यामध्ये भरून ८ x ८ फुटावर पाऊण एकरात ३८२ झाडांची लागण केली. त्यामध्ये आंतरपीक म्हणून जे अेल २४ जातीचा भुईमूग केला. १५ दिवसांनी पंचामृताची फवारणी केली. झाडे अतिशय जोमात आली. ६२ ते ६५ दिवसात ती तीन फुटापेक्षा जास्त उंच गेली. त्याचा शेंडा अडीच ते तीन फुटावर मारला आहे. (दोन महिन्यात छाटणी) नंतर शेवग्याला चांगला फुटावा आला. एका झाडाला चार फांद्यापेक्षा जास्त फांद्या आहेत व त्याची चांगल्या तर्‍हेची वाढ झाली आहे. वाढ होत असताना भरपूर प्रमाणात फुलकळी आली आहे. ४ महिन्यात झाडांची सरासरी उंची ६ ते ७ फुटापर्यंत वाढ झाली आहे. संपूर्ण झाडावर फुलकळी आहे. झाडे चांगली, बुंधा मजबुत झाला आहे.

'सीद्धीविनायक' शेवग्यात लसणाचे आंतरपीक

रोगाने पूर्ण गेलेला लसणाचा प्लॉट सुधारला


श्री. बाबासाहेब राघुनाथ पाटील, मु.पो. आढीव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर. मो. ९९२२१८००८४

'सीद्धीविनायक' शेवग्याची २० गुंठ्यामध्ये १०' x १०' वर लागवड २० सप्टेंबर २००७ ला केली. जमीन मध्यम प्रतीची असून पाणी विहीरीचे पाटने देतो.

या शेवग्यामध्येच २१ ऑक्टोबर २००७ ला लसणाचे आंतरपीक घेतले होते. सुरुवातीला बीजप्रक्रियेला जर्मिनेटर वापरले असल्याने उगवण ५ - ६ दिवसांत ९५ % झाली. हा लसूण १ महिन्याचा असताना लवकर वाढ होण्यासाठी २५ किलो युरिया दिला आणि पुन्हा आठवड्याने उरलेला २५ किलो युरिया दिला. या लसणाला युरियाची मात्रा अधिक प्रमाणात झाल्याने लसणाची वाढ होण्यापेक्षा त्याने ७० - ८० % प्लॉट खराब झाला पात पांढरट पडून करपू लागली.

हा प्लॉट सुधरविण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. शहाजी गायकवाड (९८५०५१५९९१) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रत्यक्ष प्लॉटची पाहणी करून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३० मिली १० लि. पाण्यातून ३ वेळा ८ - ८ दिवसांनी फवारण्यास सांगितले. त्यावरून लगेच मे. कृषी पंढरी अग्रो एजन्सी, पंढरपूर येथून औषधे आणून पहिली फवारणी केली. तर २५ % प्लॉट सुधारत असल्याचे जाणवले. त्यामुळे नंतर पुन्हा ७ दिवसांनी दुसरी फवारणी केली असता पूर्ण प्लॉट पूर्ववत झाला. म्हणून नंतर लसणाचे पोषण होण्यासाठी थ्राईवर,क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी ३० मिली १० लि. पाणी याप्रमाणे फवारले. त्याने प्लॉट हिरवागार होऊन लसून पोसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चौथी फवारणी वरीलप्रमाणे केली असता लसणाचे चांगल्या प्रकारे पोषण झाले. लसणाची कुडी घट्ट. ठसठशीत भरली. या लसणाची काढणी करून बाजार कमी असल्याने साठवण करून ठेवला आहे. अशाप्रकारे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पूर्ण वाया गेलेल्या लसणाचा प्लॉट सुधारून चांगले उत्पादन मिळाले.

आंतरपिके घेऊनही २०० शेवग्याचे वर्षात १५ हजार, शेंगा अजून चालूच

लसणाबरोबर शेवग्यालाही त्या आवस्थेत फवारण्या झाल्याने झाडे एप्रिलमध्ये ७ - ८ फुट उंचीची होऊन शेंगा झाल्या. झाडांवर लहान-मोठ्या १५० ते २०० शेंगा असून नवीन फुले लागतच आहेत. त्यामुळे सतत तोड चालू आहेत. शेंगा पंढरपूर मार्केटला विकतो. काढणीचा माल पाहून आठवड्यातून २ -३ वेळा तोड करत असतो. पंढरपूरला ५ शेंगाची पेंडी (गड्डी) ५ रू. ला जाते. बाजारात माल कमी-अधिक झाल्यास भावामध्ये चढ-उतार होतो. तरी इतर भाजीपाल्याच्या तुलनेने भाव चांगला मिळतो. शेंगा चालू झाल्यानंतर सतत वाफसा अवस्था ठेवल्याने शेंगा हिरव्यागार, दीड ते दोन फुटाच्या वजनदार मिळतात. आढीव ते पंढरपूर ५ - ६ किमी अंतर आहे. आतापर्यंत या २०० झाडांपासून १५,००० रू. झाले आहेत. बहार भरपूर लागलेला असून तोडे चालू आहेत.

New Articles
more...