'सिद्धी-विनायक' शेवग्याने शेतकर्यांचा जीवनात घडविलेल्या यशस्वी घटना

मुंबईच्या निवृत्तीनंतर सरांच्या शेवग्याने

बहरले आमचे आयुष्य,


श्री.महेताब हाजी शेखलाल शेख रिटायर्ड डेप्युटी असेसर आणि कलेक्टर मुंबई, मु. पो. वीट, ता.करमाळा, जि.सोलापूर (०२१५२)२४१४०१

मी शेवगा लागवडीचा लेख वाचून पारंपारिक गहू, ज्वारी, बाजरी, मका इ.कमी फायद्याच्या पिकांपेक्षा सुधारीत पद्धतीने शेती करायचे ठरविले. डॉ.बावसकर सरांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊन मोरिंगा सिध्दीविनायक जातीच्या शेवग्याची ७०० झाडे लावली. कल्पतरू खत देऊन दर १५-२० दिवसांनी पंचामृताची फवारणी करीत गेलो. त्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली. ढगाळ वातावरणात सुध्दा धुके पडून जाळी पडली नाही की, फुले गळली नाहीत. उलट पानांपेक्षा पांढऱ्या शुभ्रफुलांनी व शेंगांनी लगडलेली झाडे आज पहायला मिळतात.

यावर्षी पाऊस अजिबात पडला नाही. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा ही सर्व पिके गेली. विहित ७ परस खणून सुध्दा पाणी नव्हते. अशा परिस्थितीत थोडे थोडे पाणी देऊन शेवगा जगवला परंतु आता असे म्हणावे लागते की, शेवगा आम्हांला जगवतो आहे. आठवड्यातून ३-४ वेळा शेवगा कधी पुण्याला तर कधी करमाळ्यास पाठवतो. किरकोळ विक्री आम्ही न करता ठोक भावानेच मार्केटला पाठवतो. मालाची आवक कमी असल्यास १५-१६ रुपयांपर्यंत व जास्तच आवक झाल्यास ७ ते ८ रुपयापर्यंत भाव मिळतो. कमी पाण्यात व कमी खर्चात शेतकऱ्यांना वरदान ठरणारे हे एकमेव पीक आहे. मी ५-६ एकर शेवग्याची शेती करण्याचा विचार करीत आहे. आज कल्पतरू हे खत व फवारणीसाठी पंचामृत नेण्यासाठी आलो आहे.

शेवगा लागवडीस विरोध करणारी आई या विज्ञानाने अजून अधिक शेवगा लावायचे म्हणते

श्री.परशुराम मनोहर माळी मु.पो. विट, ता.करमळ, जि.सोलापूर

७ जुलै २००० ला एक एकरात मोरिंगा शेवग्याची लागवड ९'x ९' वर केली. एक एकरात ६२५ झाडे होती. पाणी ठिबक पद्धतीने देतो. ४ वेळा १५ दिवसाच्या अंतराने पंचामृतची फवारणी केली. कल्पतरू खत छाटणीचे वेळेस टाकले. फुल पाचव्या महिन्यात लागले. सहाव्या महिन्यात शेंगा येण्यास सुरुवात झाली. एका झाडास २०० ते २५० शेंगा होत्या. पुण्यात १५ रू. किलो भाव मिळत होता. पण आज ४/३/२००१ रोजी पुण्यात ९० रू. १० किलो भाव मिळाला. खेड्यात मात्र २० रू. किलो ने शेवगा गेला. १० किलो मीटर अंतरावर करमाळमध्ये तालुक्याचे ठिकाणी हातविक्रीत आई ने एक शेवग्याची शेंग एक रुपयास विकली. २० रू. किलोने स्वत: शेवगा विकला. त्यामुळे शेवगा लागवड करताना विरोध करणारी माझी आई पुन्हा शेवगाच लागवड करायचे आहे असे म्हणते.

छाटणी करावयाची आहे. पण माल संपत संपत नाही. दर आठवड्याला २५० किलो शेंगा निघत असे, शेंगा काढल्या की परत नवीन शेंगा भरपूर येतात. सर्व बाजूने फुटव्यालाही शेंग चालू होती. हा माल १५ डिसेंबर पासून चालू आहे. आता पर्यंत २५ हजार रुपये झाले आहेत. अजून १ महिना तरी माल चालेल. ठिबक दिवसाआड दोन तास चालवतो. छाटणी एप्रिलमध्ये करावयाची होती पण सर म्हणतात की, उन्हामुळे फुलगळ होईल. आता वाऱ्याने झाड मोडायला सुरुवात झाले आहे. एका फांदीस ५०-५० शेंगा आहेत. ५ ते १० फांद्या आहेत. तेव्हा प्रत्येक झाडास किती टेकण्या देणार? या अनुभवातून जूनमध्ये पुन्हा शेवगा लागवड करणार आहे.

New Articles
more...