'सिद्धीविनायक' मोरिंगाची चव चीनी पाहुण्यांनी घेतल्यावर चीनला मोरिंगा लागवडीसाठी रवाना

श्री. श्रीकांत नामदेव पारखे, बोरा अॅग्रो फुड (सतीश बोरा) ३९, दि २/६, शंकरशेठ रोड, सम्राट हाऊस, पुणे
फोन नं. (०२०) २६४५२२२५ / २६४५२२३५

जावजीबुवाची वाडी (दौंड) येथे २५ एकर जमीन आहे. त्यातील १५ एकरमध्ये तिळावर प्रक्रिया करण्याची फॅक्टरी आहे व इतर १० एकरमध्ये भाजीपाला लागवड करतो. त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरू खत वापरतो.

औषधे नेतेवेळेस 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा १०० बियांचे पाकीट नेले होते. त्याला जर्मिनेटरची प्रक्रिया करून लागवड केली. नंतर भाजीपाल्याला फवारणी करतेवेळी शेवग्यालाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ -३ फवारण्य केल्या. त्यामुळे झाडांची निरोगी वाढ होऊन उत्पादन चांगले येते. या शेंगांची विक्री करत नाही. शेंगा पाहुण्यांना, कामगारांना वाटतो आणि घरी खाण्यासाठीच वापरतो. तसेच आम्ही तिळाची खरेदी जळगाव पासून गुजरातपर्यंतची करत असतो. तेव्हा या पार्टांना मोरिंगा शेवग्याच्या शेंगा बॉक्समधून भेट म्हणून पाठवितो तर त्यांनाही या शेंगा खूपच आवडल्या. तिळावर प्रक्रिया केल्यानंतर त्याची परदेशात जर्मनी, सिंगापूर, मलेशिया, चीन येथे निर्यात करतो. त्यामुळे तेथील व्यापारी तिळाच्या खरेदीसाठी आमचेकडे येतात. तर त्यांना नेहमीच्या मांसाहारी जेवणापेक्षा महाराष्ट्रीयन जेवण आवडते. तेव्हा त्यांना जेवणामध्ये मोरिंगा शेवग्याची भाजी केलेली होती. ती खरोखरच इतकी आवडली की ते आम्हाला विचारू लागले "हा शेवगा कोणत्या जातीचा आहे ? याचे बी कोठे मिळते ? आम्हांला पण हेच बी आणा. आम्ही ते चीनमध्ये लावू. " तेव्हा आपल्या पुणे ऑफिसमधून 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याचे १ पाकिट घेऊन त्यांना दिले.

New Articles
more...