'सिद्धीविनायक' शेवगा हा साऱ्या जगाचा आवडता व आरोग्यदायक भाजी
प्रा. डॉ. वि. सु. बावसकर
गेली २० ते २५ वर्षे शेवगा या पिकावर सखोल संशोधन आणि विकास करून असे लक्षात आले की, शेवगा हा तिसऱ्या जगाच्या राष्ट्रातील लोकांचा कल्पवृक्ष होऊ शकतो. बऱ्याचशा प्रतिकूल परिस्थितीत उदा. हलकी, पडीक, माळरानाची, कमी चिकनमातीयुक्त, वाळुमिश्रीत जमीन जी इतर पारंपारिक भाजीपाला, फुलझाडे, फळझाडे पिकांना चालंत नाही अशी जमीन 'सिद्धीविनायक शेवगा' या पिकास चालू शकते. पावसाचे अनिशिच्त प्रमाण, एकूण पावसाचे दिवस व एकूण पडणारा पाऊस याचा अंदाज आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असते. परंतु मुळातच शेवगा या पिकास थोडे जास्त पाणी अथवा ठिबकचे वावडे (अॅलर्जी) आहे. याला उष्णतामान २५ ते ३२ डी. सेल्सिअसपर्यंत तर काही अंशी ३५ ते ४२ डी. से. असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने या पिकास शेंगा लागतात असे निष्पन्न झाले आहे. म्हणजे बहुतांशी पिकांना एवढे उच्च तापमान मानवत नाही. डाळींब आणि बोर या पिकास उष्णता व हलकी जमीन मानवते, तथापि डाळिंबामध्ये तेल्या, मर तसेच बुरशीजन्य, विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने या पिकाखालील क्षेत्र सिद्धीविनायक शेवग्याकडे वळत आहे. याचे उदाहरण म्हणजेच सटाण्याच्या (नाशिक) डाळींब भागातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. केदा सोनावणे यांनी त्यांच्या १ हेक्टर डाळींब बाग कमी करून त्यामध्ये सिद्धीविनायक मोरिंग शेवग्याची लागवड केली व त्यांचा शेवगा लंडन, कुवेतला निर्यात झाला. वातावरणातील नव- नवीन समस्या (ग्लोबल वार्मिंग) याला शेवगा किंवा इतर पिके कशी प्रतिसाद देतात याचा अभ्यास करावयाचा आहे. काही कारणाने म्हणजे व्यवस्थापन, हवामान व चुकीच्या नियोजनाने शेवग्याला फुले लागत नाही, म्हणून बी खराब आहे असे समजू नये. कारण योग्य नियोजनाने या शेवग्यास भाद्रपद आणि फाल्गुन महिन्यात फुले लागतात. वेगवेगळ्या अवस्थेत लागणारी फुले संदर्भासाठी कव्हरवर दाखविली आहेत. हे प्रमाण धरून आपण आपल्या शेवग्याच्या प्लॉटचा अभ्यास करावा व कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधून आपल्या समस्यांने निरसन करावे. हा प्रयोग आपणास निश्चितच मार्गदर्शक ठरेल.