सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा पहिल्या वर्षी ६० हजार, दुसर्‍या वर्षी १ लाख

श्री. सुनिल दिनकर पाटील, मु.पो. बहाळ, ता.चाळीसगाव, जि. जळगाव. मोबा. ९८५०७८३६२९

आम्ही ५ वर्षापुर्वी शेवग्याची लागवड केली होती मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी तो प्लॉट फेल गेला. शेवग्याचे बियाणे स्थानिक मार्केटमधीलच होते. नंतर मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची 'कृषी विज्ञान' मधून माहिती मिळाली, मासिकातील प्रत्येक 'लावा शेतात शेवगा मोरिंगा, तुमच्या भोवती पैसा घालेल पिंगा' याने तसेच शेवगा पुस्तकातील सिद्धीविनायक मोरिंगा शेवग्याची माहिती व त्याची लागवड यशस्वी केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलाखती वाचण्यात आल्या. त्याने प्रभावित होऊन पुन्हा शेवगा लागवड करण्याचे ठरविले.

२ वर्षापुर्वी शेवग्याची १ एकरमध्ये पुन्हा लागवड केली. यावेळी बियाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सिद्धीविनायक' मोरिंगा वापरले. याला कोणतीही औषधे वापरली नाही. फक्त बागेची मशागत, शेवग्याची शेंडे छाटणी, पाणी- खते देणे ही कामे केली. तर पहिल्यावर्षी १० हजार रुपये एकरी खर्च आला आणि उत्पन्न मात्र ६० हजार रुपये मिळाले. दुसर्‍या बहाराचे देखील वरील प्रमाणेच नियोजन केले तर बहार चांगला लागला आहे. हा शेवगा औरंगाबाद, धुळे, जळगाव याठिकाणी विकला. २५ ते ३० रुपये किलो दर मिळाला. आतापर्यंत ६५ हजार रुपयाचा शेवगा विकला आहे. अजून शेंगा चालो आहेत. ३० ते ३५ हजार रुपयाच्या शेंगा अजून सहज निघतील. म्हणजे जवळपास १ लाखाचे उत्पन्न यावर्षी मिळेल.

New Articles
more...