'सिद्धीविनायक' शेवग्याचे १० गुंठ्यात २ वर्षात ९० हजार

श्री. भरतेंद्र अण्णा पाटील, मु.पो. नेज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. मो. ९८९०६१६४४१

गेल्या दोन वर्षापुर्वी शेवगा या पिकाची लागवड केली आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, कोल्हापूर प्रतिनिधी श्री. केदार मोरे यांच्या सल्ल्यानुसार १० गुंठे क्षेत्रावरती शेवगा लागवड केली व दर तीन महिन्यांनी छाटणी व जर्मिनेटरची आळवणी आणि सप्तामृत फवारणी केल्यामुळे शेवगा सतत शेंगा देत राहिला. शेंगा दिसायला आकर्षक आणि चविष्ट असल्याने मार्केटमध्ये इतरांपेक्षा जास्त दर मिळाला.

या शेवग्यापासून पहिल्या बहाराला ३७ हजार, दुसर्‍या बहाराला ३३ हजार व तिसर्‍या बहाराला खराब हवामान असतानादेखील २० हजार असे एकूण दोन वर्षात ९० हजाराचे उत्पादन मिळाले आहे. फक्त १० गुंठे क्षेत्र आणि त्यावरती 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लागवड कमी पाणी असताना देखील प्रतिकूल परिस्थितीत चांगले उत्पादन व जीवनाचा आधार बनला आहे.

New Articles
more...