'सिद्धीविनायक' शेवग्यापासून १ एकरात ८० हजार ते १ लाख रू. नफा

श्री. बी. एन. पवार, मु. पो. भासर, ता. साक्री, जि. धुळे. मोबा. ९९२२५०३३७५

माझ्या सासरवाडीच्या शेतावर (परेसपुर, ता. साक्री) एक एकरमध्ये 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची लागवड १५' x १५' वर १९९८ साली केली होती. तर १९० झाडांपासून दरवेळी १०० किलो माल (शेंगा) मिळत होता. शेंगांची तोडणी आठवड्याला केली जात होती. शेंगा गुजरात, नंदुरबार, धुळे, साक्री मार्केटला त्यावेळी सरासरी ८ ते १० रू. पासून १५ रू.किलो भावाने विकल्या जात होत्या. तरी सर्वसाधारण एकरी सव्वा ते दीड लाख रू. उत्पन्न मिळत होते. खर्च वजा जाता ८० हजार ते १ लाख रू. मिळायचे. झाडांमध्ये शिफारशीपेक्षा जास्त अंतर ठेवल्याने झाडे कमी जरी बसत असली, तरी हवा खेळती राहते. त्यामुळे रोगराईला आळा बसतो. बहर चांगला लागतो. आंतर मशागत, शेंगा काढणी सोपी होती झाडांचा विस्तार बर्‍यापैकी झाल्याने उत्पादनात वाढ होते. हा शेवगा जवळपास १० वर्षे उत्पादन देत होता. गेल्या ३वर्षामुर्वी तो काढून टाकला.

आता नवीन १ एकर क्षेत्रात लागवड करण्यासाठी 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची ३ पाकिटे बियाणे आज ८ सप्टेंबर २०११ रोजी घेऊन जात आहे. त्याचीही लागवड १५ x १५ वरच करणार आहे. माझा आय.टी.आय. झाला असून चिंचवड (पुणे) येथे बॅटरीच्या कंपनीत नोकरी करीत आहे. आपली पुस्तके वाचून त्यांना मार्गदर्शन करतो.

New Articles
more...