स्थानिक मार्केट

शहराजवळच्या मार्केटचा फायदा
मोरिंगा शेवग्यालाही


श्री. नामदेव बबनराव मोझे मु. पो.लोहगाव (मोझेआळी), ता.हवेली, जि.पुणे फोन:२६६८३७७६

मोरिंगा शेवग्याच्या बियांची दोन पाकिटे आपल्या येथून नेली होती. बियांना जर्मिनेटर वापरल्याने उगवण चांगली झाली, रोपे साधारण १ महिन्यात तयार झाली. ९' x १०' अंतरावर १'x १'x १' चा खड्डा घेऊन त्यात कल्पतरू खत २०० ते २५० ग्रॅम मातीत मिसळून १० गुंठ्यामध्ये रोपांची लागवड केली. पाण्याच्या पाळ्या ८ ते १० दिवसांनी देत होतो. ३० दिवसाच्या अंतराने पंचामृताच्या २ फवारण्या केल्या. पहिल्या फवारणीने २ ते २|| फुटाची झाडे झाल्यावर शेंडा कट केला आणि नंतर दुसरी फवारणी केली. त्यमुळे झाडांचा फुटवा वाढला. झाडाची उंची ३ ते ४ फुट झाल्यावर फुलकळी लागली. फुलकळीची गळ होत असल्याने पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये सल्ला घेण्यासाठी आलो होतो. त्यानुसार पंचामृताची एक फवारणी केली.

रोप लावल्यावर शेंगा ७ व्या महिन्यात चालू झाल्या. शेंगांची आठ दिवसाला तोडणी करत होतो. लोहगाव, खडकी मार्केटला शेंगा होलसेल भावाने विकत होतो. सुरुवातीला होलसेल १८ ते २० रू. किलो भाव मिळाला. नंतर बाजारभाव ढासळले तरी ८ ते १० रू. चा भाव मिळाला.शेवग्याला भाव नाही असे कधीच झाले नाही. एका बहारापासून ६ ते ७ हजार रू.मिळाले. शेवटीशेवटी पाणी कमी पडल्याने पण गल होते व माल संपतो. नाहीतर ८ ते १० हजार रू. सहज झाले असते. या शेवग्याचे वरील प्रमाणे पंचामृताच्या ३-४ फवारण्या व कल्पतरू खताचे २-३ डोस प्रत्येक बहाराला देऊन आतापर्यंत ३ बहार घेतले आहेत. प्रत्येक बहारापासून ८ ते १० हजार रू. मिळतात. १५० झाडांमधील वार्‍याने व जनावरांमुळे काही झाले मोडून वळून गेली आहेत. त्यासाठी आज पुन्हा मोरिंगा शेवग्याचे १ पाकीट व जर्मिनेटर घेऊन जात आहे. याची लागवड आता पाऊस पडल्यामुळे २-३ दिवसात करणार आहे.

सातारचे व्यापारी निरेस येऊन
मोरिंगा शेवगा खरेदी करीत

श्री. रायकर शांताराम राजाराम
(B.Sc.Agri)
मु. पो. पाडेगाव फार्म, ता. फलटण, जि. सातारा
फोन:(०२०) २५२८०८०० (पुणे)

मी हिंजवडी येथे मोरिंगा शेवग्याचे प्लॉट पहिले. त्यावरून मोरिंगा शेवग्याची एक एकरमध्ये सप्टेंबर २००१ ला लागवड केली. बियाणे पुणे ऑफिसमधून नेले होते. त्याला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून रोपे तयार केली.रोपांना पंचामृताची एक फवारणी केली होती. रोपे एक महिन्याची झाल्यावर दिवाळीत लागवड १०'x १०' वर केली. लागवडीनंतर कुठलीही फवारणी केली नाही. शेवग्याचा विशेषांक घेतला होता. त्यातील माहितीनुसार छाटणी केली. शेवग्याला ५ व्या महिन्यात फुलकळी लागून नंतर ८ व्या महिन्यात शेंगा चालू झाल्या. आठवड्यातून दोनदा शेंगाची तोडणी करत असतो. शेंग हिरवीगार, मगज भरपूर व वजनदार असल्याने बाजारभाव चांगला मिळत होता. शेंगा पारगाव खंडाळा,पुणे येथे पाठवित होतो. सातारचे व्यापारी निरेमध्ये येऊन शेंगानी खरेदी करत असत. १५ ते २० रू. भाव मिळत होता. ह्या शेंगा ७-८ महिने चालू होत्या. एप्रिल २००२ मध्ये झाडांची छाटणी करून त्याला शेणखत १ ट्रोली व लेंडीखताची १ ट्रोली दिले आहे. आता सध्या नवीन बहाराला वाघ्या लागल्या आहेत.

दुसर्‍या १ एकर क्षेत्रामध्ये पुन्हा याच शेवग्याची लागवड फरण्यासाठी जून २००३ मध्ये मोरिंगा शेवग्याची ८ पाकिटे पंचामृताची डोस घेऊन गेलो होतो. सध्या प्लॉट निरोगी असून फुलकळी लागली आहे.

प्रतिकूल जमीन, शेवगा बी दुसऱ्याचे, दोन वर्षे पान, फुल नाही, शेंग नाही. शेवग्याची नुसती लाकडे उभी
असे असताना एवढा नामांकित भरगच्च शेवगा कसा? - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची किमया!


सौ. निकीता पंकज शिंदे, मु. पो. सांगवी, ता. बारामती, जि.पुणे. फोन (०२११२) २६५४९८, मो.: ९८२२१९५१३५

आम्ही १ एकर ४ गुंठे क्षेत्रात पी के एम कोईमतूर शेवग्याची लागवड केली होती. २ वर्षे झाली. झाडे खूप वाढली. शेंगा मात्र लागला नव्हत्या.

रान भारी काळ्या मातीचे आहे. ३०-३४ फुटपर्यंत काळी माती आहे. पहिला बहार पूर्णता फैल गेला. नंतर पावसाला चालू (२००९ चा) झाल्यावर संपूर्ण पानगळ झाली, झाडांची वाढ थांबली, खोडकूज रोगाचा प्रादुर्भाव झाला. शेजारचे अनेकजण म्हणत शेवगा काढून टाका, ऊस लावा, आम्ही सांगवीतील दुकानातून रासायनिक औषधे आणून फवारत होतो. मात्र त्याने झाडे सुधारण्यापेक्षा स्कोर्चिंग येऊ लागले. तेव्हा त्या दुकानदाराला विचारले. रासायनिक सोडून जैविकमध्ये आपल्याकडे काय असेल तर द्या. त्यानंतर त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे शेवगा पुस्तक आणून दिले. ते वाचल्यानंतर आम्ही सरांचा सल्ला घेण्यासाठी आणि सप्तामृत औषधे नेण्यासाठी पुण्याला आलो.

नोव्हेंबर २००९ मध्ये सप्तामृत १ लिटरचा पूर्ण सेट घेऊन गेलो. त्याची पहिली फवारणी केली असता झाडांचा फुटवा वाढून पानांना काळोखी आली. नंतर लगेच दुसरी फवारणी साधारण १२-१३ दिवसांनी केली. त्याने फुलकळी लागण्यास सुरुवात झाली. नंतर २ फवारण्या १५ दिवसाला सप्तामृताचा घेतल्या. त्यातील पहिल्या फवारणीने फुलांचे वाध्यात आणि दुसर्‍या फवारणीने वाध्याचे शेंगात रूपांतर झाले. ही शेंग मार्च २०१० मध्ये चालू झाली. सध्याचा प्लॉट पाहता शेजारच्यांचाही विश्वास बसत नाही. दररोज तोड करू लागलो. रोज १५० ते २०० किलो माल निघू लागला. शेंगेला चमक (Glaze) जबरदस्त होती. शेंगेला चवही जबरदस्त होती. सुरुवातीला १७० ते १८० रू./१० किलोला भाव मिळाला. नंतर एप्रिलमध्ये भाव वाढला, तेव्हा इतरांना २८० रू./१० किलो भाव असताना आम्हांला मात्र ३२० रू./१० किलो भाव मिळू लागला आणि जूनमध्ये तर ५२० रू. /१० किलो भाव बारामती मार्केटला मिळाला. सर्व माल बारामतीला विक्री केला. ५ किलोचे ६३ बंडल नेले होते. तरी माल पडून राहत नव्हता. बदला वेगळा करतो. ४|| ते ५ तन मालात १ तन बदला म्हणजे लहान निघतो. ५ किलोच्या बंडलात २ किलो खाली व २ किलो वर लांब आणि १ तन माल जो छोटा असतो तो प्रत्येक बंदलात १ किलो टाकतो. म्हणजे वजनात छोटी शेंग मापात टाकली कि वजन बरोबर होते. वजनात जास्त नाही व विक्रेत्यासही परवडते. घेणारा - विकणारा व शेतकरीही खुष होतो. सप्तामृताने शेंगेला एवढी चव येते कि विक्रेता शेंगा विकतो पण खात नाही. मात्र ह्या शेंगेनी एकदा भाजी खाल्ली, तेव्हापासून तो आता आठवड्यातून ३ वेळा घरी भाजी करतो.

वादळात फुल गळाले नाही

मध्यंतरी मार्चमध्ये माल चालू असताना सप्तामृत फवारणी घेतली होती. तर वादळ वर झाल्याने फांद्या मोडल्या .पण फुल गळाले नाही हे विशेष.

जमिनीतील क्षारामुळे शेंगा जांभळ्या निघायच्या सप्तामृतची फवारणी घेतली कि त्या शेंगा हिरव्यागार, चमकदार, चवीलाही उत्कृष्ट असा अनुभव आला.

आंगठ्यापेक्षा जाड शेंगा झाल्या तरी विक्री होते. आतापर्यंत दीड लाख रू.झालेत. खर्च मजुरीसह ३० -३४ हजार रू. आला. अजून २५-३० हजार रू. होतील.

New Articles
more...