तुलनात्मक अभ्यास

व्यापारी पिकापेक्षा शेवगा परवडला

श्री.प्रभाकर काशिनाथ तोडकर मु.पो.कुपवाड, ता.मिरज, जि.सांगली

मी सामाजिक वनीकरणमध्ये असिस्टंट डायरेक्टर होतो. मी गेले ३ वर्षापासून आपल्या कृषी विज्ञान मासिकाचा वर्गणीदार आहे. आपले तंत्रज्ञानाने दोन वर्षापूर्वी शेवगा २ || एकर लावला. शेवग्याचे बी १० x २५ सें.मी.च्या पिशवीत लावले.

संकनबेडचा प्रयोग - सपाट वाफ्यापेक्षा थोडी खोल माती उकरून पिशव्या ठेवल्याने पाणी चांगले बसते. एकमेकांना त्याचा आधार असल्याने झाडे कोलमडली नाही. मी सरांच्या शेवग्याची कार्यशाळा या कार्यक्रमात पुण्यात हजर होतो. रोपे १ महिन्यात लागवडीस तयार झाली. पण वेळेअभावी त्याची लागवड उशीरा केली.उशीरा म्हणजे जवळजवळ ३-४ फुट उंच रोपे झाली होती. पण सुरुवातीला पिशवी मोठी घेतल्याने फारशी उडचन आली नाही. जमिनीत ६ इंचाखाली मुरूम असल्याने आणि झाडे चार फुट उंच झाल्याने १x१x१ च्या खड्यात बसत नव्हती. त्यामुळे जे.सी.बी. ने २|| x २|| x २|| चा खड्डा करून त्यात थोडी काळी माती भरून लागवड केली. सुरूवातीपासून झाडावर पंचामृत्चे स्प्रे घेत होतो.

सुरुवातीलाच रोपांची उंची वाढल्याने लागवडीनंतर १ महिन्यात शेंडा छाटला. पंचामृताच्या ३ फवारण्या केल्या. कल्पतरू २ वेळा लागवड करताना व फुल लागताना ५०० ग्रॅम प्रत्येकी दिले होते. त्यामुळे ६ व्या महिन्यात माल चालू झाला. साधारण ३००-४०० शेंगा प्रत्येक झाडावर होत्या. सांगलीत ८ ते १० रू. भाव मिळाला. सांगली व मिरज मार्केटला ५० शेंगाची पेंडी बांधून १५ ते २५ रू. पर्यंत होलसेल भाव मिळतो.परंतु शेंगा चांगल्या असल्याने खाणार्‍या गिर्‍हाईकाला जास्त पैसे देऊन घ्यावा लागतात

पंचामृताचा आणि कल्पतरूचा प्रभाव इतका होता की शेंगा एका बाजूला तोडल्या तरी फुले दुसर्‍या बाजूला चालूच होती. झाडांची वाढ जास्त झाल्याने सरांनी सांगितले छाटणी करा. माल कमी झाल्यावर जानेवारीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या फांद्यांची छाटणी छत्रीसारखी केली. माल लगेच ३-४ महिन्याने चालू झाला.

शेवग्याला जास्त कष्ट न करता यशस्वी प्रयोग झाला आहे. द्राक्षाला कष्ट जास्त. फवारण्या जास्त, नवीन जाती आल्या तसेच तोडणी, पेकिंग, ठिबक असा खर्च येतो, शिवाय भाव मिळेलच याची गेरेंटी नसते.

द्राक्ष विकताना बाजारभावाची शाश्वती राहत नाही. शिवाय मालाची वसुली करायला गेल्यावर जिवितास धोका होतो. मी आता असे ठरवले की, ज्या हजारो शेतकर्‍यांनी आपल्या तंत्रज्ञानाने बेदाणे निर्मिती केली. तसा बेदाणा तयार करायचा व गणपतीला माल विक्रीस मार्केट कमीटीकडे पाठवायचा व निश्चित भाव घ्यायचा.

पारंपारीक बागायती पिकापेक्षाही
शेवगा सरस हे एक आश्र्चर्यच !

बाळकृष्ण रामचंद्र गुरव, मु. पो. एखतपुर, ता.सांगोला. जि.सोलापूर (०२१८७) २६०२२९

सुरुवातीस जेव्हां मी एकाचा ऊसाच्या रानातला शेवग्याचा प्लॉट पहिला तव्हा मी आपल्याकडून बी घेऊन गेलो तर वडील म्हणाले बलायाती जमिनीत कोठे शेवगा लावतात का ? हा मोडेल प्लॉट शेती खात्याचे मार्केट कमिटीचे व जिल्ह्यातील सर्व लोक बधून जात आहेत. तरीही मी त्यांचे बोलण्याकडे दुर्लक्ष करून शेवग्याची लागवड केली. सध्या त्यामुळे हा प्रयोग बधून तालुक्याचे मुख पीक ऊस, हळद तरकारी पेक्षा हे मोरिंगा शेवग्याचे पीक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

New Articles
more...