डा.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान
सिद्धी विनायक मोरिंगाची चव चीनी पाहुण्यांनी
घेतल्यावर चीनला मोरिंगा लागवडीसाठी रवाना
श्री.श्रीकांत नामदेव पारखे, बोरा अग्रो फुड (सतीश बोरा) ३९, डी २/६, शंकरशेठ
रोड, सम्राट हाऊस, पुणे फोन:(०२०) २६४५२२२५,२६४५२२३५
जावजीबुवाची वाडी (दौंड) येथे २५ एकर जमीन आहे. त्यातील १५ एकरमध्ये तीळावर प्रक्रिया
करण्याची फॅक्टरी आहे व इतर १० एकरामध्ये भाजीपाला लागवड करतो. त्याला पंचामृत औषधे
व कल्पतरू खत वापरतो.
औषधे नेतेवेळेस सिद्धी विनायक मोरिंगा शेवगा १०० बियांचे पाकिट नेले होते. त्याला जर्मिनेटरची
प्रक्रिया करून लागवड केली. नंतर भाजीपाल्याला फवारणी करतेवेळी शेवग्यालाही पंचामृताच्या
२ - ३ फवारण्या केल्या. त्यामुळे झाडांची निरोगी वाढ होऊन उत्पादन चांगले येते. या शेंगांची
विक्री करत नाही. शेंगा पाहुण्यांना, कामगारांना वाटतो आणि घरी खाण्यासाठीच वापरतो.
तसेच आम्ही तिळाची खरेदी जळगाव पासून गुजरातपर्यंतची करत असतो. तेव्हा या पार्टाना
मोरिंगा शेवग्याच्या शेंगा बॉक्समधून भेट म्हणून पाठवितो तर त्यांनाही या शेंगा खुपच
आवडल्या. तिळावर प्रक्रिया केल्यानंतर त्याची परदेशात जर्मनी, सिंगापूर, मलेशिया, चीन
येथे निर्यात करतो. त्यामुळे तेथील व्यापारी तीळाच्या खरेदीसाठी आमचेकडे येतात. तर
त्यांना नेहमीच्या मांसाहारी जेवणापेक्षा महाराष्ट्रीयन जेवण आवडते. तेव्हा त्यांना
जेवणामध्ये मोरिंगा शेवग्याची भाजी केलेली होती. ती खरोखरच इतकी आवडली की ते आम्हाला
विचारू लागले हा शेवगा कोणत्या जातीचा आहे? याचे बी कोठे मिळते? आम्हांला पण हेच बी
आणा. आम्ही ते चीनमध्ये लावू असे त्यांनी सांगितले. तेव्हा आपल्या पुणे ऑफिसमधून सिद्धी
विनायक मोरिंगा शेवग्याचे १ पाकिट घेऊन त्यांना दिले.
मोरिंगा शेवग्याचे एका बियाने केले शेतकरी
मित्रांना लागवडीसाठी प्रवृत्त
प्रविण अरुण तराळे, मु.पो.वाडेगाव, ता.बाळापुर, जि. अकोला
सरांनी मला मॉडेलसाठी मोरिंगा शेवग्याचे एकच बी दिले होते. सरांनी सांगितल्याप्रमाणे
त्या झाडाला पूर्ण पंचामृत तंत्रज्ञान वापरले. बी लावल्यानंतर एक महिन्याच्या अंतराने
तीन पंचामृत फवारण्या केल्या व १/२ किलो कल्पतरू खत टाकले. फुलकळीच्या वेळी लागोपाठ
आठ आठ दिवसांनी दोन फवारण्या केल्या. या पाच पंचामृत फवारण्यातच त्या झाडाला २५ किलो
(४०० नग) शेंगा मिळाल्या. १ रुपयाला १ शेंगा अशा भावाने त्यांची विक्री केली. शेजारच्या
शेतकर्यांनी ते शेवग्याचे झाड पाहून ते लागवडीस तयार झाले. आज मी आपल्याकडून सिद्धी
विनायक मोरिंगा शेवग्याची ५ पाकिटे त्यांच्यासाठी घेऊन जात आहे व इतर शेतकर्यांना शेवगा
लागवडीसाठी उत्साहित करीत आहे.
आपला शेवगा पंचामृताने चवीष्ट
श्री. मोहन मारुती गरूड, मु.पो.बेलसर,ता.पुरंदर, जि.पुणे
आपल्याकडून शेवगाचे बी नेले होते, ते जर्मिनेटरमध्ये भिजवून पिशवीत लावले असता ७०%
उगवण झाली व रोपे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लावली.त्याला पंचामृत औषधांची फवारणी
घेतली असता झाडांची वाढ चांगली झाली. पहिला बहार असून सुध्दा ४० ते १०० शेंगा लागल्या
व त्यासुद्धा हिरव्यागार आहेत. विशेष म्हणजे पंचामृत फवारणीने शेंगा एकदम चविष्ट लागतात.
आता पुढील आठवड्यात शेंगा मार्केटला आणणार आहे. हेच तंत्रज्ञान आता टोमॅटोला सुध्दा
वापरणार आहे.
अकलुज इंदापूर रोडवरील मोरिंगाचा प्लॉट शेतकर्यांच्या कुतुहलाचा विषय
श्री. बागल राजेंद्र करिपाल, मु.पो. बाळा ता. इंदापूर, जि.पुणे पीक शेवगा
आमची बावडा येथे शेती असून नारायणगांव जि.पुणे येथील कृषी विद्यालयामध्ये शिकत असताना
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नारायणगांव येथील प्रतिनिधींशी भेट झाली. त्यांच्याशी चर्चेनुसार
६० गुंठे क्षेत्रामध्ये १५ x १५ फुट अंतरावर मोरिंगा शेवगा बी लावले. जमीन हलकी आहे.
लावण्यापूर्वी रोपे तयार करून घेतली होती. रोपे दोन महिन्यात तयार झाली. लागवड झाल्यानंतर
३ महिन्यांनी शेंडा छाटला. नंतर फुट जोमदार निघाली. फुलांचा बहार चांगला आला. त्या
वरती थोड्या प्रमाणात मावा, तुडतुडे होते. या संदर्भात परत चर्चा करून पंचामृतातील
प्रोटेक्टंटचा स्प्रे घेतला असता कीड आटोक्यात आली.माझा प्लॉट अकलूज इंदापूर रोड वरती
आसल्यामुळे येणारे जाणारे शेतकरी कुतुहलाने शेवग्याबद्दल चौकशी व माहिती विचारात होते.
इतका प्लॉट अप्रतिम आहे. आता सध्या माल चालू असुन शेंगा २ ।। ते ३ फुट लांबीच्या आहेत.
शेंगाची जाडी चांगली असल्याने भाव चांगला मिळत आहे. एका झाडाला २५० ते ३०० शेंगा लागल्या
आहेत. हा शेवग्याच्या बियाचा चांगला अनुभव घेतला. यापुढे सर्व पिकांसाठी डॉ.बावसकर
टेक्नॉंलॉजी वापरणार आहे.
सुकलेल्या शेवग्याच्या शेंगा
पंचामृतामुळे दुरुस्त होऊन १५ हजार रू.
श्री. शंकर दगडू कोळेकर, मु.पो. सविंदणे, ता.शिरूर, पुणे
कृषी विज्ञान अंक माझ्या वाचण्यात आल्यामुळे पंचामृत औषधे गेल्यावर्षी शेवग्याला वापरली.
३० गुंठ्यामध्ये ४५० झाडे आहेत. लागवड जुलै २००१ ची. सुरुवातीला पानगळ होऊन शेंगा वाकड्या
होत होत्या. पोसल्या जात नव्हत्या. तसेच झाडांवर मावा आला होता. तेव्हा या पंचामृताच्या
एका फवारणीमुळे शेवग्याची पानगळ थांबून शेंगा वाकड्या न होता पोसल्या तसेच फुलकळी लागून
शेंगा वाढल्या. सुरुवातीला शेंगांची खालील बाजू सुकली जात होती. त्या शेंगा हिरव्यागार
झाल्या. गेल्यावर्षी पाऊस नसल्याने फारसे लक्ष दिले नाही. तरी या एका ५०० मिलीच्या
फवारणीवर १५ हजार रू.च्या शेंगा पुणे मार्केटला विकल्या.
चालू वर्षी पानगळ, फुलगळ तसेच शेंगांना डिंक्या रोग येऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच
पंचामृत औषधे वापरण्यासाठी ५०० मिलीचा डोस घेऊन जात आहे. कारण गेल्यावर्षी डिंक्यारोगाने
बर्याच शेंगा खराब झाल्या होत्या.
पंचामृत व कल्पतरू वापरून शाश्वत सेंद्रिय शेती
श्री. पवार रामराव रेशमाजी मु.सायाळ पो.कोरेगांव, ता.लोहा, जि.नांदेड
शेवगा लागवडीसाठी बियाणे जर्मिनेटर या औषधामध्ये रात्रभर भिजवून, सावलीत सुकवून पिशव्यामध्ये
अर्धा सेंमी.खोल लावले. पिशव्या भरताना प्रत्येक बॅगमध्ये कल्पतरू सेंद्रिय खत टाकल्याने
व जर्मिनेटर ची प्रक्रिया केल्याने बियांची उगवण चांगली व लवकर झाली.
एक महिन्यामध्ये रोप लागवडीसाठी तयार झाले. ९' x ९' फुटावर खड्डे घेऊन एकून ८०० झाडे
लावली. कल्पतरू सेंद्रिय खत वापरले. तीन महिन्याने साडे तीन फुटावर छाटणी केली. पिंचामृताची
फुवारणी केली. ५ महिन्यात फुले लागली.सातव्या महिन्यात शेंगा पूर्ण झाडांना सुरू झाल्या.
विशेष म्हणजे आमच्या भागातील शेती निमकोरडवाहू असल्याने शेवग्यास पाणी अत्यंत कमी दिले
आहे. केवळ पंचामृत व कल्पतरू सेंद्रिय खतामुळे शेवग्याची यशस्वी लागवड होऊन उत्पादन
घेता आले. आज पर्यंत २० ते २२ हजार रुपये मिळाले आहेत. या सेंद्रिय खतावरील शेवग्याचा
अनुभव पाहता नवीन लागवड केलेल्या १९ x १९ फुटावरील मोसंबीच्या बागेमध्येही शेवगा लावणार
आहे. मोसंबीची फळे मिळेपर्यंत शेवग्याचे उत्पन्न चालू राहील.