शेवगा हा देशाचा व तिसर्या जगातील शेतकर्यांचा कल्पवृक्ष - कार्यशाळा संपन्न

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी रिसर्च फाऊंडेशन, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अग्रो) प्रा.लि. आणि 'कृषी विज्ञान' मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने 'शेवगा हा देशाचा व ३ ऱ्या जगातील शेतकऱ्यांचा कल्पवृक्ष' ही कार्यशाळा ७ ऑगस्ट २०१० रोजी सायंकाळी ६ वा. संपन्न झाली.

कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रतापराव साळवी, माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी आपल्या भाषणातून डॉ. बावसकर यांच्याबद्दल गरीब शेतकऱ्यांसाठीची तळमळ व त्यांच्यासाठी काहीतरी नवीन संशोधन करण्याची चिकाटी यावर थोडक्यात माहिती देऊन शेवग्याबद्दल मार्गदर्शन केले.

अध्यक्ष डॉ. साठ्ये, माजी अधिष्ठाता पोद्दार मेडीकल कॉलेज, मुंबई यांनी आयुर्वेदामध्ये शेवग्याचे योगदान, तसेच त्याचा वयोमानानुसार व ऋतुमानानुसार आहारातील प्रमाणबध्द वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले. नाबार्डचे महाप्रबंधक श्री.व्यंकटेशवर राव यांनी आपले मॉडेल्स मध्ये संशोधक वृत्ती आणि चिकित्सा असल्याने आपणास नाबार्डमार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.

ज्येष्ठ शेती शास्त्रज्ञ डॉ. वि.सु. बावसकर यांनी आपला मुख्य मार्गदर्शनात शेवगा लागावादिबद्दलचे तंत्रज्ञान समजावून सांगितले. त्याचबरोबर शेवग्याला नुसते भाजी म्हणून पाहता त्यापासून अनेक प्रकारच्या व्याधी बऱ्या होत असल्याने त्याच्याकडे 'आरोग्याचा दागिना' म्हणून पाहिले पाहिजे. शेवगा हे प्रत्येक घरी शेतकऱ्याकडे पर्यायी पीक म्हणून असावे. ज्या शेतकऱ्याकडे फक्त १० गुंठेच क्षेत्र आहे त्याने बंधाने शेवगा लावला पाहिजे. ज्यांच्याकडे अर्धाएकर जमीन आहे. त्यांनी किमान २ गुंठे तरी शेवगा लावला पाहिजे. ज्यांच्याकडे २ एकर आहे त्यांनी १० गुंठे, ५ एकर असणार्‍यांनी अर्धा एकर, १० एकर असणार्‍यांनी १ एकर आणि १०० एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्र असणाऱ्यांनी २ एकर किंवा 'चांगल्या व्यवस्थापनाची' सोय असल्यास ५ एकर याप्रमाणात शेवगा लावला पाहिजे. याला बाजारभाव जादा मिळत असल्याने लागवडीच्या क्षेत्रात प्रमाणापेक्षा जादा वाढ करू नये. कारण याचे व्यवस्थापन चुकल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेवग्याचे क्षेत्र आणि उत्पादन वाढले तर याचा कांदा, टोमॅटो, लसूण, ऊस, कापूस होऊ नये म्हणून नुसते मार्केट किंवा निर्यातीवर अवलंबून न राहता शेवग्यापासून मूल्यवर्धीत प्रक्रिया करून आयुर्वेदिक औषध निर्मिती केली पाहिजे. शेवग्याच्या पानांची पावडर, रस, बियाचा आणि शेंगेचा मगज याचा ३ऱ्या जगातील आफ्रिकन राष्ट्रात पाणी शुद्धीकरणासाठी वापर करतात. तसा आपल्या देशात प्रत्येक घरी परसात १ झाड लावून जलशुद्धीकरणातून याचा प्रसार होणे गरजेचे आहे. नुसते ब्लिचींग पावडर किंवा इतर रसायनांचा वापर करून त्याचा मानवाच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याकडे देशाचे आरोग्य खात्याने लक्ष देऊन संपुर्ण देशभर तालुकावार आयुर्वेदीक औषध निर्मिती केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. शेवग्याचे हे महत्व लक्षात घेऊन पहिलीपासून ते पीएच.डी. पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये एक विषय शेवग्यावर असणे जरूरीचे आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना शेवग्याबद्दलचे आकर्षण आणि ज्ञान प्राप्त होईल. त्याचबरोबर नुसते शेवग्यावरच थांबून चालणार नाही तर याप्रकारच्या पिकांचा अभ्यास करून त्यापासून रोजगार निर्मिती व जमिनीचे आरोग्य बिघडणार नाही याकडेही पाहणे जरूरीचे आहे.

शेवग्याची विक्री करताना मार्केटचे योग्य नियोजन बसवणे गरजेचे आहे. गुजरात व दक्षिणेकडील राज्य - केरळ, आंध्र, तामिळनाडू तसेच मोठी मेट्रो शहरे येथील बाजारभावाचा अभ्यास, कोणत्या मार्केटला कोणत्या दिवशी तेजी असते याचा अभ्यास याचे नियोजन करून सर्व माल एकाच मार्केटला न नेता विभागून पाठविला असता आपणास बाजारभाव मिळू शकेल असे बीड मधील एकर मॉडेलला उद्देशून की ज्यांनी बीड जिल्ह्यात ३० शेतकर्‍यांचे एक या प्रमाणे १०० गावात कृषी विज्ञान मंडळे स्थापन करून ३ हजार एकरवर 'सिद्धीविनायक' शेवग्याचा प्रयोग करताना तो यशस्वी होण्यासाठी सांगितले.

छत्तीसगडमध्ये 'सिद्धीविनायक' शेवग्यास मागणी

छत्तीसगडचे श्री. मानापुरे यांनी 'सिद्धीविनायक' शेवग्याचे आदिवासी आणि नक्षली भागात राबविलेल्या यशस्वी प्रयोगांवर मार्गदर्शन केले. या भागामध्ये पुर्वी शेवगा लावला जात नसे. तेथे आपण मॉडेल प्लॉट तयार करून त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सल्लानुसार तंत्रज्ञानाचा वापर यामुळे तेथील लोकांना रोजगाराबरोबरच उत्पन्नाचे साधन निर्माण झाले. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांमध्ये 'सिद्धीविनायक' शेवग्याबाद्दलचा आपलेपणा तयार झाल्याने ते 'अपना सेजना' किंवा 'अपना शेवगा' असे संबोधू लागले. सौ. वसुधा सरदार यांनी सेंद्रिय शेतीमाल उत्पादन करण्यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदानामुळे शेतीमाल उत्पादनातील वाढ, दर्जा व तीकाऊपणातील वाढ असे विविध होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले.

सिमारूबाचे लागवडीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान

श्री. रत्नाकर जाधव यांनी सिमारूबापासून खाद्य तेल व बायोडीझेल निर्मितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी बद्दलचे बहारीनच्या शेतकर्‍यांचे अनुभव सांगितले. सिमारूबाची लागवडीचे उगवण क्षमता फक्त १० % असते. ती जर्मिनेटरने ९० ते ९५ % झाली आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पद्धतीने १००० रोपे तयार करून बिना मातीची ती विमानाने अमेरिकन अंबॅसेडर टू बहारिन यांना पाठवून ती यशस्वीपणे त्यांनी जगविली. (संदर्भ : कृषी विज्ञान, ऑगस्ट २००८, पान नं. ९) प्रगतीशील 'सिद्धीविनायक' शेवगा उत्पादक शेतकरी श्री. वसंतराव काळे (कृ.वि.,मार्च १०, पान नं. २९), अड. खिलारे (शेवगा पुस्तक, पान नं. ३९), सौ. शिंदे (कृ.वि., जुलै १०, पान नं. १५) यांनी आपले अनुभव कथन केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन डॉ.बावसकर यांनी केले. या कार्यशाळेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व भागातील अनेक शेतकर्‍यांनी घेतला.

New Articles
more...