'सिद्धीविनायक' शेवगा शेतकर्यांना वरदान ठरेल !
शेवगा लागवड-
जमीन - काळ्या, वरकस,मध्यम जमिनीमध्ये शेवग्याची लागवड करता येते. तसेच चुनखडीयुक्त जमिनीमध्ये देखील शेवग्याची लागवड होऊ शकत असल्याने जगाची ढासळलेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. भारी जमिनीमध्ये शेवग्याचे वाढ झपाटयाने होते. डाळींबामध्ये शेवगा लागवड करू नये कारण शेवग्याची अळी डाळींबाच्या फुलामध्ये शिरून डाळींबाचे उत्पादन घटते.
हवामान - सर्व प्रकारच्या हवामानामध्ये शेवगा पीक घेता येते. शेवगा पावसाळी हवामानात उत्तम. एरवी कोणत्याही महिन्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरले तर चांगले. कडक उन्हाळ्यात मात्र लावू नये, तेव्हा नर्सरी करून लावली तरी चालते. पण जेव्हा रोपे लहान असतात तेव्हा विदर्भातील व मराठवाडयातील ४६ डिग्री से.ला तग धरण्यासाठी झावळ्यांच्या सावलीची गरज निश्चितच आहे.
बियांची निवड- जाती-१) सिद्धी विनायक (मोरिंगा),
२)दापोली कृषी विद्यापीठ (सुरुची)
सिद्धी विनायक (मोरिंगा)
या जातीचा लागवड व्यापारी तत्वावर मोठ्या प्रमाणावर केली जाते.
उगवण - बियांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी जर्मिनेटर २५ मिली + १ ते २ चमचे प्रोटेक्टंट + अर्धा लिटर पाणी +बियांचे ४ टे ५ पाकिटे या प्रमाणात वी रात्रभर भिजवून नंतर सुकवून लावल्यास ७० टक्के उगवण होते. एकरी ६८० रोपे पुरेशी होतील.
रोपे तयार करणे- रोपे ४ ते ६ इंच आकाराच्या प्लॅस्टिकच्या पिशिव्यांमध्ये पिशवीच्या तळापासून वरील टोकापर्यंत १ इंच अंतर सोडून निचरा व्यवस्थित होण्याकरिता ४ छिद्रे पाडावीत. १ ते २ चमचे कल्पतरू सेंद्रिय खत पिशवीमध्ये टाकून पिशवी भरावी व हळूवारपणे पाणी द्यावे. जर्मिनेटर व प्रोटेक्टंट यांच्या मिश्रणाने प्रक्रिया केलेले बी अर्धा सें.मी. खोल आडवे टोकावे व दररोज झारीने पाणी द्यावे. पंचामृताची (प्रत्येकी ३ ते ५ मिली +१ ली.पाणी) आळवणी व फवारणी केल्यास बियांची उगवणक्षमता वाढून रोपे लवकर तयार होतात. मर होत नाही. रोपे ८ ते १० इंचांपेक्षा जास्त वाढू देऊ नयेत. कारण वार्याने, वादळाने शेंडा मोडण्याची शक्यता असते. तेव्हा दांडा कसा जाड होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
लागवडीचे अंतर - १'x १'x १' आकाराचा खड्डा घ्यावा.कल्पतरू खत ५० ग्रॅम वापरावे.कायम जागी शेवगा लावताना ६'x ६' अंतरावर लावला तरी चालतो परंतु शेवग्याचे १० वर्षापर्यंत उत्पन्न घ्यावयाचे असेल तर ८'x ८' हे अंतर योग्य आहे.
पाणी- आठवड्यातून एकदा किंवा १० दिवसातून एकदा पाणी द्यावे. परंतु शेवग्याची वाढ झपाटयाने होत असल्याने ८ व्या दिवशी न चुकता पाणी दिले तर शेंगा बोथट, तुरट न लागता गरयुक्त, वजनदार, एकसारख्या, दीड ते दोन फुट लांबीच्या भरतील.
खाते - साधारणत: दर दोन महिन्यांनी कल्पतरू सेंद्रिय खत १०० ते १५० ग्रॅम प्रत्येक झाडास द्यावे. रासायनिक खत वापरू नये, कारण शेवगा माजतो व कीड पडते.
औषधे - शेवगा हे पीक कीड व रोगास सहसा बळी पडत नाही. तथापि, शेवग्यास फुलमाशी(Fly) चा प्रादुर्भाव होतो व पंचामृतामधील प्रोटेक्टंटमुळे या फुलमाशीचा बंदोबस्त होतो तसेच पंचामृतामुळे शेवग्याचे दर्जेदार व अधिक उत्पन्न मिळते.