'सिद्धीविनायक' शेवगा शेतकर्यांना वरदान ठरेल !
(शेतकर्याला शेवग्याचा होलसेल दराने १२ रू. किलोपर्यत भाव १२ हि महिने मिळतो तर किरकोळीने
तो २० रू. किलोपर्यंत मिळतो.) दुसरे म्हणजे तुलनात्मक दृष्टया शेवग्याचे भाव स्थिर
व चढे असतात. इतर नाशवंत माल उदा. वांगी, टोमॅटो, पालेभाजी किंवा कांदा. कांद्याच्या
बाबतीत सांगावयाचे झाले तर 'नेईल तर टोकाला, नाहीतर तळाला' अशी परिस्थिती आहे. अशा
या दुष्टचक्राच्या वावटळीत गेली ३० -४० वर्षे शेवगा सापडला नाही हे आपले भाग्य. त्याचप्रमाणे
इतर कोणतेही फळपीक घ्यावयाचे झाले तर उदा. डाळींब उत्पादन घ्यावयाचे झाले तर २ ते ३
वर्षे लागतात, तर लिंबू पिकास २ वर्षे थांबावयास लागते. द्राक्ष पिकामध्ये रोगांचे
प्रमाण जास्त, अफाट खर्च व हा माल तयार झाल्यानंतरही त्याचे पैसे हातात येईपर्यंत शेतकर्याची
न झोप न भाकरी गोड लागले अशी तर्हा होते. लिंबास फक्त उन्हाळ्यातच खात्रीशीर भाव सापडतो.
डाळींबाचे १५ जुलै ते १५ ऑगस्ट वं १५ जानेवारी ते २८ फेब्रुवारीच्या कालवधीमध्येच विक्रमी
भाव सापडतात. टोमॅटोचे समीकरण आजपर्यंत फार मोजक्याच शेतकर्यांना जमले आहे. वांगी
कधी १० रुपये किलो तर कधी १ रुपया किलो या दराने विकली जातात. अशा समस्या शेवग्याम्ध्ये
उदभवत नाही आणि म्हणूनच शेवग्याचे गणित मांडावयाचे झाल्यास, एका झाडापासून सर्व साधारण
दोन्ही सिझनच्या मिळून ५०० शेंगा सहज मिळतात. किलोमध्ये १६ शेंगा बसतात. म्हणजेच, ३१
किलो शेंगा x १० रू.= ३१० रू. एका झाडापासून १५ महिन्यात मिळतात. म्हणून अगोदर सांगितल्याप्रमाणे
उदभवणार्या समस्या टाळण्यासाठी ग्रामीण तरुणांनी, ग्राम उद्योजकांनी, फार्मसी पदवीकाधारकांनी,
सामाजिक कार्य करणार्या पदवीधारांनी आयुर्वेदिक औषधी प्रक्रिया आणि महत्व लक्षात घेऊन
विविध स्तरावर औषधी प्रक्रिया आणि महत्व हे विषय हाताळून नवीन प्रकल्प राबवावेत व शेवग्याची
स्ट्रॉबेरी होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा प्रकल्पामध्ये कृषी बाजार समिती, नाबार्ड,
विविध ग्रामोद्योग व सहकारी संस्था यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
निर्यात व आयुर्वेदिक दृष्टीने शेवग्याचा उपयोग
उष्ण व थंड या दोन्ही देशांमध्ये शेवग्याची निर्यात करता येते. शेवगा हा बद्धकोष्ठतेवर
बहुगुणी आहे. साधारणत: बद्धकोष्ठता ही उष्ण पदार्थ. मसाले युक्त पदार्थ, विविध प्रकारचे
मांसाहार खाल्याने निर्माण होते. उष्ण प्रदेशामध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात उदभवते.
या समस्येवर देशामध्ये तसेच इतर विविध भागांमध्ये इसबगोलचा वापर मोठया प्रमाणावर केला
जातो. यामध्ये इसबगोलची फक्की कोमट पाण्यामध्ये घेतात. ही घेताना कमी जास्त प्रमाणात
घेतली जाते. तसेच ठसका लागण्याची शक्यता असते. त्यामुळे इसबगोल प्रभावी असले तरी घेण्यास
असुलभ असल्याने लोक यावरती पर्याय शोधू लागले आहेत. तेव्हा शेवग्याच्या पॅलेट्स (बारीक
गोळ्या ) हा प्रभावी पर्याय ठरेल.
शेवगा हा ज्वर कमी करण्याकरिता, डोकेदुखी थांबविण्यासाठी, रक्तदाब, सांधेदुखी यावर
प्रभावी आहे. सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे शेवग्याने नेत्रविकार बरे करता येतात.
ऱ्हस्व व दीर्घदृष्टी या विकारांवर शेवगा आहारात नित्य असणे गरजेचे आहे. आयुर्वेदामध्ये
शेवग्याच्या गरापासून तसेच हळद व इतर आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून दृष्टीदोष दूर
केला जातो या विषयावर नुकत्याच एका नामांकित व्यक्तीने आयुर्वेदातील डॉक्टरेट ही पदवी
संपादन केली आहे. शेवग्यावर अधिक सखोल संशोधन झाल्यास जगभरातील २० टक्के व देशातील
४ टक्के नेत्रविकाराने पिडीत (आंधळेपणा) रुग्ण या औषधांनी बरे होतील असे वाटते. अॅलोपॅथिक
सारख्या औषधांमुळे मानवी शरीरावर होणारे इतर दुष्परिणाम व त्यावर होणारा अब्जावधी रुपयांचा
खर्च वाचेल आणि अर्थव्यवस्था सुधारण्यास मदतच होईल.