'सिद्धीविनायक' शेवगा शेतकर्यांना वरदान ठरेल !

छाटणी -

(विशेष महत्वाचे): अडीच ते तीन फुट (जमिनीपासून) अंतरावर रोपे छाटावीत (शेंडा कट करावा) म्हणजे बाजूला निघणार्‍या फुटीतून ६ व्या ते ७ व्या महिन्यात फुलोरा येईल व ८ ते १० व्या महिन्यात शेंगा मिळतील. शेवगा लागवड ते छाटणीपर्यंत औषध फवारणी व सेंद्रिय खतांचा वापर खाली दिल्याप्रमाणे करावा.

पंचामृत फवारणी व खतांचा वापर

(जर्मीनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर व प्रोतेक्टंट)

१) लागवड झाल्यानंतर ३० दिवसांनी

जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ राईपनर १०० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + ६ ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लीन + १०० लि.पाणी

२) लागवड झाल्यानंतर ६० दिवसांनी - जर्मिनेटर ३५० मिली. + थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + १५० लि.पाणी

९० दिवसांनी (छाटणी झाल्यानंतर )-३) थ्राईवर ७५० मिली.+ क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + १५० ते २०० लि.पाणी

कल्पतरू सेंद्रिय खात १)लागवड झाल्यानंतर ३० दिवसांनी -

५० ग्रॅम खात प्रत्येक झाडास २) ९० दिवसांनी (छाटणी झाल्यानंतर )-

१०० ग्रॅम खत प्रत्येक झाडास
तिसर्‍या महिन्यात ३ फुटावर छाटणी केल्यानंतर चौथ्या महिन्यापासून फुले लागण्यास सुरुवात होईल. काही प्रमाणात वाऱ्यामुळे फुलगळ होणे अपेक्षित आहे. पाने पिवळी पडण्याची शक्यता असते.
हे टाळण्याकरिता ५०० मिली. पंचामृत फवारणी (१०० लि.पाण्यामध्ये) करावी. झाडाची वाढ खुंटल्यास कल्पतरू २५० ग्रॅम प्रत्येक झाडास द्यावे. पाचव्या महिन्यात थ्राईवर १ लि.+ क्रॉंपशाईनर १ लि.+ राईपनर ५०० मिली+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली + २०० लि.पाणी फवारल्यास शेंगा जास्त प्रमाणात लागतील. ६ व्या व ७ व्या महिन्यात सुतळी, दाभणाच्या जाडीच्या शेंगा काही वाकड्या तर काही सरळ दिसतात शेंगांचा घोस लागलेला दिसल्यास शेवगा सशत्क आहे असे समजावे. ७ व्या महिन्यात थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि.+ राईपनर ७५० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली + २०० लि.पाणी असा डोस (आवश्यकता असल्यास) द्यावा. ७ ते ९ महिन्यापासून शेंगा तयार होतात. प्रत्येक झाडास साधारण ३०० शेंगा लागल्या नसल्या तर या शेंगा निघाल्यानंतर पेन्सिलच्या आकारची डोळ्याजवळ एक सुत जोडून छाटणी करणे. गवत काढून चाळणी करून कल्पतरू सेंद्रिय खत बांगडी पद्धतीने ५०० ग्रॅम प्रत्येक झाडास द्यावे. छाटणी करताना उंची साधारण हात पोहचेल इतक्या अंतरावर करावी व पंचामृत प्रीझमची फवारणी ( जर्मिनेटर ५०० मिली. + थ्राईवर ६५० - ७५० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + १०० लिटर पाणी) करावी. (या वेळेस फुलामध्ये अळी पडण्याची शक्यता असते म्हणून प्रोटेक्टंटचे प्रमाण वाढविलेले आहे.

प्रत्येक फवारणीमध्ये प्रोटेक्टंट वापरताना ४ ते ५ तास भिजवून वस्त्रगाळ करून निवळी वापरावी.)

१२ व्या महिन्यात परत फुले लागतात. १४ ते १५ व्या महिन्यात परत शेंगा तोडणीस येतात. साधारण २०० शेंगा प्रत्येक झाडास अपेक्षित असतात. ३०० शेंगा लागल्यास झाड सशत्क आहे असे समजावे.

पाणी देण्याची पद्धत- पावसाळ्यात सहसा पाणी द्यावे लागत नाही. पावसाळ्यानंतर काळ्या जमिनीत दर १० दिवसांनी तर हलक्या जमिनीत दर ८ दिवसांनी पाणी द्यावे. फुले व शेंगा लागल्यानंतर, मार्च महिन्यामध्ये मात्र महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये तापमान ३५ डिग्री सें.च्या दरम्यान असते. या काळामध्ये दर ८ दिवसांनी पाणी देणे गरजेचे आहे. म्हणजे शेंगा वजनदार, मांसल, हिरव्यागार, २ फुटापर्यत लांब निघू शकतात.

New Articles
more...