'सिद्धीविनायक' शेवगा शेतकर्यांना वरदान ठरेल !

सध्यापरिस्थिती : गेले ४ -५ वर्षातील प्रतिकुल परिस्थितीमुळे उदा. पाऊस लांबणे, खरीप हंगाम लवकर संपणे, रब्बीमध्ये पाऊस कमी पडणे, थंडी अजिबात नसणे, उन्हाळा अतिशय कडक (४२ डिग्री ते ४६ डिग्री से.पर्यंत) पालेभाजी लागवडीमधील समस्या,विविध पिकांचे भावातील चढउतार,उदा.आंबा, डाळींब, स्ट्रॉबेरी, भाजीपाला, पिके, नैसर्गिक आपत्ती अशा एकना अनेक समस्यांमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाल्याने सध्या शेतकर्‍यांवर दरडोई ९०० रुपयांचा तर एकत्र कुटुंबावर १ ते ३ लाख रुपये कर्जाचा बोजा आहे.

परिणाम: हा बोजा विविध उपाय करूनही कमी झाला नाही. पर्यायाने आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांच्या कापसासारख्या पिकांच्या नुकसानीमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

उपाय: अशा परिस्थितीतून बाहेर पडावयाचे असेल तर पारंपारिक शेतीतून बाहेर निघून, निसर्गावर मात करून ज्या पिकाला अधिक भाव आहे, ज्या पिकातून वर्षाकाठी कमीत कमी ४० ते ५० हजार रुपये मिळतील व अशा पिकांद्वारे गेली ५ वर्षातील घेतलेले कर्ज टप्प्या-टप्प्यातून फेडता येईल असे पीक १० वर्षे चालविता आले तर सर्व समस्या सहज सोडविता येतील. अशा पिकांचा शेती संशोधनातील विविध शास्त्रज्ञ, तज्ञांनी शोध घेऊन पध्दतशीरपणे नियोजन करून असे प्रकल्प शेतकर्‍यांना द्यावेत.

शेवगा लागवडीचे महत्व:आमच्या दृष्टीकोनातून शेवगा हे एक महत्वाचे व अत्यंत उपयोगी पीक आहे. नारळ या पिकास 'कल्पवृक्ष' संबोधले जाते. परंतु नारळ या पिकाचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. उदा.नारळाची लागवड केल्यापासून ३ ते ४ वर्षापर्यंत नारळ लागत नाहीत. उशीरा नारळ लागतात, तसेच झाडाची वाढही मंद असते. यामध्ये फळगळ ही प्रकर्षाने जाणवणारी विकृती आहे. शूट बोअरर, शूट अॅटॅक (shoot Borer, shoot Attack) चे प्रमाण जास्त असते. त्याचप्रमाणे दरवर्षी नारळ झाडाला लागतीलच याची शाश्वती नाही. ह्याच कारणामुळे केरळसारख्या भागामध्येच फक्त नारळाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.


तथापि, शेवगा हे पीक घेतले तर वरील समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. हे पीक झपाटयाने वाढणारे, अधिक उत्पन्न देणारे व बहुगुणी असे आहे. शेवगा लागवडीचा महत्वाचा फायदा म्हणजे शेवग्याची सावली (वसवा) पडत नाही. एरवी ग्रीन हाऊस करिता ७५% जाळी (नेट) वापरली जाते. त्याऐवजी शेवग्याचा वापर केल्यास करोडो रुपयांचा खर्च वाचतो याचे शास्त्रज्ञांनी संशोधन करावे व असे प्रकल्प राबविण्यासाठी नाबार्ड, राष्ट्रीयकृत बँकांनी अर्थसहाय्य करावे.


कडुनिंब,आंबा,चिंच या झाडांची सावली (वसवा) पिकांवर पडते. त्यामुळे इतर पिकांचे २५ ते ३० टक्के नुकसान होते. म्हणून शेवग्याची लागवड केल्यास २५ ते ३० टक्के अतिरिक्त फायदाच होतो. ह्या कारणांमुळे शेतकर्‍यांना बांधावर देखील शेवग्याची लागवड करता येते. याचे उदाहरण द्यावयाचे झाले तर, सर्वसाधारणपणे जळगांव जिल्ह्यातील भागांमध्ये कापसाची लागवड केली जाते. याठिकाणी देखील शेवग्याची लागवड करता येते व आर्थिक समतोल साधता येतो. याच भागांमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून अडाणी शेतकर्‍याने बांधावर १६० कागडयाचे ४ महिन्यात ६०,०००/- रुपये व ३७५ मोगर्‍याचे ४ महिन्यात ६०,०००/- रुपये मिळविले. तेव्हा याच धर्तीवर जगभरातील शेतकर्‍यांनी बांधावर शेवगा लावून कृषी क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवून आणता येईल. तसेच ज्या शेतकर्‍यांकडे जादा क्षेत्र आहे परंतु मजुरांचा तुटवडा,पाणी कमी, आहे अशा ठिकाणी शेवगा लागवड अतिशय फायदेशीर ठरते.
New Articles
more...